पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा)दि.19मार्च2025 या दिवशी सुमारे 16 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर "बाप"होण्याचं स्वप्न ज्ञानेश्वर चौधरी यांचे पूर्ण झाले. खुपच आनंदात हे कुटुंब जुळ्या मुलांच्या बाळांचा जन्म झाल्याचा आनंद साजरा करत होते. परंतु अचानक जे घडले ते कदापी भगवंताला ही मान्य नसेल….दोन गोंडस जुळ्या बाळांच्या मातेची मात्र प्राणज्योत मालवल्याची दुर्दैवी घडली आहे. ही वार्ता एखाद्या माहेर ची साडी या चित्रपटाप्रमाणेच... सदरील घटनेची माहिती कळताच पाचोरा शहरातील सावनेरकर हॉस्पिटलमध्ये नातेवाईक,मित्र परिवार यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
पाचोरातील बाहेरपुरा येथील माहेरवाशीण कै.सौ.ज्योती ज्ञानेश्वर चौधरी वय अंदाजे 37 या महिलेला लग्नाच्या 16 वर्षानंतर दि.19मार्च 2025 रोजी दु.4:00 वाजता सावनेकर हॉस्पिटल येथे एक मुलगी एक मुलगा अश्या दोन बाळांना तिने जन्म दिला. दोन्ही नवजात शिशू जन्माला येताच तीन तासात बाळाला जन्म देणारी आई ची मात्र प्राणज्योत हृदय विकाराच्या झटक्याने मालवली आहे. या दुखद घटनेची माहिती मिळताच महिलेच्या परिवाराने हंबरडा फोडला होता. लग्न होऊन 16 वर्ष पूर्ण झाले तरी बाळ जन्माला येत नसल्याने आयुष्यात असंतोष होता म्हणून मागील अनेक वर्षांपासून कै.सौ.ज्योतीच्या कुटुंबाने नाशिक येथून वैद्यकीय उपचार घेतले होते. त्या अनुषंगाने योग्य उपचार घेतल्याने सौ.ज्योतीला दिवस गेले होते. याचा आनंद गगनाला भिडणारा होता. तसेच या दोन्ही पती-पत्नीला व दोन्हीच्या आई वडिलांना प्रचंड हर्षउल्हास झाला. सौ.ज्योतीने 19मार्च 2025 रोजी एक मुलगा व एक मुलगी असे दोन बाळांना जन्म दिला याचा परिवाराला खूप आनंद झाला परंतु बाळच्या 30तासानंतर त्या आनंदात दुःखाचा डोगर कोसळला. सौ ज्योतीस अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने ती मरण पावली. या घटने मुळे शहरात प्रचंड हळहळ व्यक्त झाली असून ही घटना म्हणजे मराठी चित्रपट माहेरची साडी या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल ही जन्माला येते आणि तिच्या आईचे निधन होते. सदर घटना या प्रकारे झाल्याचे पाचोरा बाहेरपुरा भागात चर्चिले जात आहे. या घटनेमुळे ज्योतीच्या माहेरी व सासरच्या परिवारावर, दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Comments
Post a Comment