इयत्ता तिसरी -चौथी शिक्षकांचे चार दिवसीय प्रशिक्षणाला सुरुवात शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा - गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांचे प्रतिपादन
राजेंद्र खैरनार(पाचोरा)-मुख्य संपादक
येथील पंचायत समिती शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जळगाव मार्फत इयत्ता तिसरी व चौथीच्या शिक्षकांसाठी तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. चार दिवसीय प्रशिक्षण दोन टप्प्यात होणार असून दोनशे शिक्षक सहभागी झाले आहेत. दि 30 जून 26 रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी विजय पवार, गट समन्वयक जितेंद्र पाटील, केंद्र प्रमुख अनिल पाटील, शांताराम वानखेडे, महेंद्र सिंग पाटील यांच्या उपस्थितीत झाले. तज्ञ मार्गदर्शक म्हणून विनोद धनगर, राकेश धायबर, विरपाल पाटील,प्रदीप पाटील, अंकुश पाटील यांनी कामकाज पाहिले.इयत्ता तिसरी चौथीच्या नवीन अभ्यासक्रमाबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.याबाबत बोलताना गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सांगितले की नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता तिसरी व चौथीच्या अभ्यासक्रमाची नवीन पाठयपुस्तके उपलब्ध करून दिलेली आहेत. शिक्षकांनी अध्यापनाच्या पारंपारिक पद्धतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापन करतांना करावा. निपुण भारत अभियान व मिशन स्कॉलरशिप उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी.उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय तज्ञ गिरीश भोयर यांनी केले.प्रास्ताविक केंद्र प्रमुख अनिल पाटील यांनी केले. आभार केंद्र प्रमुख जितेंद्र पाटील यांनी मानले.प्रशिक्षण यशस्वीतेसाठी उप प्राचार्य प्रा.एस एस पाटील, प्रा.जितेंद्र बडगुजर, एम. एम. कनिष्ठ महाविद्यालय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment