*लिनेस क्लब ऑफ पाचोराकडून ३५० विद्यार्थ्यांसाठी त्रिवेणी उपक्रमांचा संगम:**#पर्यावरण संवर्धनासाठी चित्रकला-घोषवाक्य प्रदर्शनी,#शैक्षणिक साहित्य व # रोपवाटप 'एक वर्ग–एक रोप– एक जबाबदारी' अध्यक्षा प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांच्या संकल्पनेतून हरित भविष्याचा संदेश*
दिनांक 27 जून 2026 रोजी *, श्री सु भा पाटील प्राथमिक विद्यामंदिर* येथे *लिनेस क्लब ऑफ पाचोरा* द्वारे पर्यावरण संरक्षण यावर आधारित *चित्रकला व स्लोगन ( घोषवाक्य ) यांची प्रदर्शनी* चे आयोजन करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांची कला विशेष असते प्रत्येक विद्यार्थ्यांची कल्पना विशेष असते म्हणून चित्रकला व स्लोगन स्पर्धे ऐवजी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पुरस्कार म्हणून शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच 17 रोपांचे वाटप देखील लिनेस क्लब द्वारे करण्यात आले. *अध्यक्षा प्रा सौ . जयश्री ताई वाघ* यांनी आपल्या मनोगतातून वाढते तापमान आणि दुष्काळ लक्षात घेता झाडांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व त्यांच्या संकल्पनेतून प्रत्येक वर्गाला एक एक रोपाची काळजी घेण्याची जबाबदारी देण्यात आली, ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे वचन मुलांनी दिले.यात विशेष म्हणजे शाळेतील *शिशू वर्गाने* ही उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि प्रतिसाद दिला. प्रसंगी लिनेस क्लब *सदस्या सौ. शुभांगी ताई धनगर* यांच्या कडून रोपांचे दान करण्यात आले . या उपक्रमात अण्णासो *.श्री नामदेव धनगर* व *श्री राहुल दादा धनगर* यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमातून 350 विद्यार्थ्यांना लाभ प्राप्त झाले. या प्रसंगी क्लबच्या सचिव सौ सरलाताई पाटील, कोषाध्यक्ष प्रिया जी लाहोटी, सदस्या सौ. रूपालीताई पाटील, सौ. उज्वला जी चोरडिया , सौ. शुभांगी ताई पाटील तसेच सु. भा. पाटील प्राथमिक विद्यामन्दिर शाळेच्या सौ. सारिका पाटील मॅडम , सौ. जयश्री पाटील मॅडम ,सौ. चारुशीला मॅडम , सौ. रूपाली निकम मॅडम , श्री अभिजीत महालपुरे सर , श्री पंकज पाटील सर, सौ. दिपाली शिंपी आणि सौ. नागणे मॅडम , सौ. महाजन ताई प्रामुख्याने उपस्थित होत्या. उपक्रम यशस्वी करण्यास क्लब चे सदस्य व शाळेतील गुरुजन वर्ग यांनी मिळून कार्य पार पाडले.
Comments
Post a Comment