सकाळ वृत्तपत्र समूहाच्या 'गौरवगाथा पुरस्काराने' डॉ. स्वप्निल पाटील यांचा सन्मान
राजेंद्र खैरनार(पाचोरा)मुख्य संपादक
पाचोरा : वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा आणि समाजाप्रती असलेल्या समर्पित भावनेची दखल घेत सकाळ वृत्तपत्र समूहातर्फे सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा येथील संचालक डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील यांना प्रतिष्ठेचा 'गौरवगाथा पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
'सिद्धिविनायक'चे रोपण आणि विश्वासाचा वटवृक्ष :
२०१९ मध्ये सुरू झालेल्या 'सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल'च्या भिंतींवर जे ब्रीदवाक्य कोरले आहे "मातीतल्या माणसांची मनोभावे सेवा... निरामय आरोग्यासाठी आयुष्यभर समर्पण!" तेच पाटील दांपत्याच्या जगण्याचे मुख्य सूत्र आहे. आज या रुग्णालयाचे रूपांतर अवघ्या सात वर्षांत एका विशाल वटवृक्षात झाले आहे. अचूक निदान आणि रुग्णांप्रती असलेली आपुलकी ही या रुग्णालयाची मुख्य सूत्रे आहेत. आज येथे अद्ययावत I.C.U., N.I.C.U., C.T. Scan सेंटर, 2D Echo आणि डायलिसिस यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या रुग्णालयाला मिळालेले NABH मानांकन हे येथील गुणवत्तेवर आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर जागतिक स्तरावर शिक्कामोर्तब करते.
"मातीतल्या माणसांची मनापासून सेवा करणे हाच आमच्या आयुष्याचा खरा गौरव असून, रुग्ण घरी जाताना त्याच्या डोळ्यांत दिसणारे समाधान हे कोणत्याही सुवर्णपदकापेक्षा श्रेष्ठ असते," ही भावना जपून डॉ. पाटील गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देत आहेत.
सामाजिक बांधिलकी आणि विश्वासाची नवी व्याख्या :
सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून १ जुलै २०२३ पासून त्यांनी रुग्णालयात MJPJAY आणि PMJAY या शासकीय योजना कार्यान्वित केल्या. या अंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक गरजू रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातात. सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने केवळ उपचारच नव्हे, तर रुग्णांच्या मनातील भीती दूर करून त्यांना जगण्याची उमेद दिली आहे. पाचोरा आणि भडगाव परिसरातील प्रत्येक कुटुंबासाठी हे रुग्णालय आज हक्काचं 'आरोग्य मंदिर' बनलं आहे.
या सन्मानामुळे पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल डॉ. स्वप्निल दादा पाटील तसेच सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्व सहकारी वृंद यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment