श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न
.. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री. गो.से हायस्कूल ,पाचोरा येथे आज मंगळवार दिनांक 30 जून रोजी किमान कौशल्य विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक श्री. शरद माथूरवैश्य सर हे जवळपास 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले.
. संस्थेचे चेअरमन मा. नानासो. श्री. संजय वाघ यांच्या हस्ते श्री.शरद माथूरवैश्य सर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन मा. दादासाहेब श्री. खलील देशमुख हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून तांत्रिक विभागाचे चेअरमन मा. अण्णासो.श्री. वासुदेव महाजन, संस्थेचे जेष्ठ संचालक मा. आप्पासो.श्री सतीश चौधरी, मा.दादासाहेब श्री. योगेश पाटील, मा.आबासो.श्री. भागवत महालपुरे सर, मा. दादासो.डॉ.श्री. जयवंत पाटील, शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. एस. एम.जाधव सर, श्री. एस. एच. पवार सर, श्री.एस.डी.पाटील सर, सौ.पी.एम.वाघ मॅडम, माजी पर्यवेक्षक श्री. शांताराम चौधरी सर, श्री.एस.एन पाटील सर,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर यांनी केले. संस्थेचे चेअरमन मा. नानासो.श्री. संजय वाघ व मा. दादासाहेब खलिल देशमुख यांनी आपल्या मनोगतातून श्री. शरद माथूरवैश्य सर यांनी शाळेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले व सेवापुर्ती कार्यक्रमाच्या आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील सर, पर्यवेक्षिका सौ.ए. आर.गोहिल मॅम, श्री.आर.बी. बांठिया सर, श्री. एम. टी. कौडिण्य सर, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख श्री. मनीष बाविस्कर सर, क्रीडा प्रमुख श्री. एस.पी. करंदे सर, कार्यालयीन प्रमुख श्री.अजय सिनकर श्री. शरद माथूरवैश्य सरांचे मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.
. या कार्यक्रमाचे ईशस्तवन श्री.सागर थोरात तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.आर.बी.बोरसे सर व आभार श्री.एम.एन. देसले सर यांनी केले.
Comments
Post a Comment