श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे शाळा प्रवेशोत्सवानिमित्त वकृत्व स्पर्धा संपन्न
पाचोरा( प्रतिनिधी )पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था, संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा.येथे दिनांक 29 6/ 2026.सोमवार रोजी शाळा प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून आंतर शालेय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शाळेतून एकावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या आठ विद्यार्थ्यांची अंतिम स्पर्धा सोमवारी शाळेच्या प्रांगणात घेण्यात आली. मुख्याध्यापक श्री.एन. आर. पाटील.( ठाकरे) यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा विषय माझी शाळा, सुंदर शाळा होता. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी प्रभावीपणे वकृत्व सादर करत आपल्या शाळेविषयी मत मांडले. सर्व विजेत्यांना त्यांच्या शिक्षकांसह सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेतील प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रथम योगेश्वरी सुदर्शन चौधरी सातवी ड, द्वितीय तेजल शाम चव्हाण. सातवी फ, तृतीय देवयानी बाबुलाल पाटील सातवी अ
खालील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आली. रुपेश संजय हटकर सातवी ब, देवयानी यशवंत पाटील सातवी क, प्रत्युष प्रशांत शिरसाट सातवी ड, प्राची कमलेश नाथांनी सातवी, खुशी शांताराम पाटील सातवी फ
यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक महेश कौंडिण्य, सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र बोरसे, ज्येष्ठ शिक्षक प्रीतमसिंग पाटील उपस्थित होते. परीक्षक म्हणून शाळेतील शिक्षक अरुण कुमावत, श्रीमती पी. एम. पाटील मॅडम यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment