श्री.गो.से. हायस्कूलला दोनशे गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप...! "अग्रवाल नवयुवक मंच" चा उल्लेखनीय उपक्रम

राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक
पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूल,पाचोरा येथे  अग्रवाल नवयुवक मंचातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गुणवंत दोनशे विद्यार्थ्यांना सहाशे वह्यांचे वाटप करण्यात आले.  मुख्याध्यापक श्री. एन.आर. पाटील. ( ठाकरे) यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला अग्रवाल नवयुवक मंचाचे अध्यक्ष गिरीश  मोर, उपाध्यक्ष गौरव मोर, आदित्य अग्रवाल, दिग्विजय पटवारी, मृणाल अग्रवाल, लखन अग्रवाल,आयुष पटवारी यश मोरे. अर्पित पटवारी, शैनिक जैन, पवन अग्रवाल, प्रथम अग्रवाल, पराग मोर, पवन पटवारी, कृष्णा मोर, पियुष अग्रवाल आदी  पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक यांनी आपल्या मनोगतातून अग्रवाल नवयुवक मंचाच्या सृत्य कार्यक्रमाबद्दल कौतुक केले तर गिरीश मोरे यांनी यानिमित्ताने समाजासाठी योगदान बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक श्री. एन.आर. पाटील, उपमुख्याध्यापक आर. एल.  पाटील, पर्यवेक्षक अंजली गोहिल, महेश कौंडण्य,सांस्कृतिक प्रमुख आर. बी. बोरसे, ज्येष्ठ शिक्षक प्रीतमसिंग पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..