खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारां बाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करीत,कठोर कारवाई करण्याबाबत व्हाइस ऑफ मिडियातर्फे पोलिस निरीक्षक यांना निवेदन....
पाचोरा प्रतिनिधी,
महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकाराबाबत केलेले अपमानास्पद वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारे आहे. एखाद्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्याच्याविषयी अवमानकारक भाषा वापरणे ही केवळ त्या पत्रकाराची नव्हे, तर संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राची अवहेलना आहे. संजय दिना पाटील यांचा पाचोरा व्हाईस ऑफ मिडियातर्फे निषेध नोंदवत तातडीने कारवाई करण्यात यावी अशा आषयाचे निवेदन पो. नि. राहुलकुमार पवार यांना देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी व्हाईस ऑफ मिडिया पाचोरा तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, तालुका कार्याध्यक्ष राहुल महाजन, शहर अध्यक्ष प्रविण बोरसे, तालुका संघटक चिंतामण पाटील, सहसचिव जाविद शेख, ज्येष्ठ पत्रकार अनिल आबा येवले, अनवर शेख हे उपस्थित होते. निवेदनावर व्हाइस ऑफ मिडियाचे ज्येष्ठ सल्लागार दिलीप जैन, दिपक पवार, दिलीप परदेशी, नरसिंग भुरे, निखील मोर, दिलीप परदेशी, बाबुलाल पटेल, प्रशांत येवले यांच्या सह्या आहेत.
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम ही प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, वेब, रेडिओ, साप्ताहिक, मासिक, छायाचित्रकार, कॅमेरामन, युट्यूब, सोशल मीडिया आणि स्वतंत्र पत्रकारांना एकत्र आणणारी आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना आहे. भारतासह ७८ देशांमध्ये कार्यरत असलेली ही संघटना पत्रकारांचे हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार कल्याण आणि लोकशाही मूल्यांच्या जतनासाठी सातत्याने कार्यरत आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता समाज, शासन आणि जनतेमध्ये संवादाचा सेतू म्हणून काम करते. सत्य घटनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, सत्तेला प्रश्न विचारणे आणि लोकहिताचे प्रश्न मांडणे हे पत्रकारांचे घटनात्मक व नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे पत्रकारांचा सन्मान राखणे ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे.
लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची भाषा वापरली गेल्यास समाजात पत्रकारांविषयी चुकीचा संदेश जातो. अशा विधानांमुळे पत्रकारांवर दबाव निर्माण होतो, त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते आणि मुक्त व निर्भीड पत्रकारितेच्या वातावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता आणि माध्यमांचा सन्धान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे.
म्हणूनच व्हॉईस ऑफ मीडिया खालील मागण्या करीत आहोत. व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम च्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचर्चा शासनाने तातडीने गंभीर दखल घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, संबंधित खासदारांनी संपूर्ण पत्रकार बांधवांची जाहीर व
लेखी बिनशर्त माफी मागावी. त्यांनी दिलगिरी नाही माफी मागावी, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या वर्तनाची चौकशी करून कायद्याच्या चौकटीत आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात यावी, भविष्यात पत्रकारांचा अवमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे धोरण शासनाने जाहीर करावे, राज्यातील पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी पत्रकार संरक्षणा संदर्भातील उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, जो पर्यंत या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत संजय दिना पाटील आणि शिंदे गट यांच्या पत्रकार परिषदेवर आम्ही बहिष्कार टाकतो., राज्यात संजय दिना पाटील यांच्या सारखे पत्रकार, पत्रकारितावर आंग पाखड करणाऱ्या प्रत्येका विषयीची चूक लक्षात येताच त्याच क्षणी गुन्हा दाखल करण्यात यावा, आम्ही स्पष्ट इशारा देऊ इच्छितो की, या प्रकरणात शासनाने तातडीने योग्य कारवाई न केल्यास व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम राज्यातील प्रत्येक - जिल्हा, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक शहरात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासन व संबंधित लोकप्रतिनिधींवर राहील.
पत्रकारांचा सन्मान हा लोकशाहीचा सन्मान आहे. पत्रकारांवरील शाब्दिक, मानसिक किंवा शारीरिक हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. पत्रकारांच्या स्वाभिमानाचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी व्हॉईसऑफ मीडिया (व्ही ओ एम) इंटरनॅशनल फोरम शेवटपर्यंत संघर्ष करेल. तरी आपल्या स्तरावर या निवेदनाची तातडीने दखल घेऊन ते महाराष्ट्र शासनाकडे पाठवावे व योग्य ती कार्यवाही व्हावी अशा आषयाचे निवेदन पाचोरा व्हाईस ऑफ मिडियातर्फे पो. नि. राहुलकुमार पवार यांना देण्यात आले. तसेच निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment