पाचोरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्यशोध न्यूज
(पाचोरा वार्ताहर) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात दि: 21 जून 2026 रोजी सकाळी 6:00 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवस मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बीज मंत्रासह सूर्यनमस्कार, त्यासोबतच शयन स्थिती, विपरीत शयन स्थिती, बैठक स्थिती व दंड स्थितीतील निवडक आसनांचा अभ्यास करण्यात आला. प्राणायामानंतर प्रार्थनेने योगवर्गाचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी प्रा डॉ अतुल सूर्यवंशी, प्रा डॉ श्रावण तडवी यांनी योगशिक्षक म्हणून प्रात्यक्षिके दाखवली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वासुदेव वले यांनी केले. माजी प्राचार्य बापूसाहेब डॉ बी एन पाटील यांनी उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले तर उपप्राचार्य डॉ जे व्ही पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वासुदेव वले, माजी प्राचार्य बापूसाहेब डॉ बी एन पाटील, उपप्राचार्य प्रा डॉ जे व्ही पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ जे पी बडगुजर, माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख प्रा डॉ जे डी गोपाळ, पाचोरा तालुका क्रीडा समन्वयक प्रा गिरीश पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ श्रावण तडवी, प्रा डॉ कमलाकर इंगळे, प्रा डॉ माणिक पाटील, प्रा डॉ योगेश पुरी, प्रा महेंद्र महाजन, प्रा राजेश वळवी, प्रा मनोज पवार, प्रा महेश नेरपगार, प्रा संदीप टोपले, श्री बी जे पवार, श्री रवी चौधरी, श्री घनश्याम करोसिया, श्री जयेश कुमावत; वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, तथा शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🙏🏻
Comments
Post a Comment