चार जिल्ह्यांत अव्वल ठरत मयुरी महालेची सुवर्णकामगिरी; शिंदे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा निकालात दबदबा...! डी.फार्म. परीक्षेत घवघवीत यश; गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुन्हा सिद्ध


राजेंद्र खैरनार | पाचोरा
पाचोरा (जि. जळगाव) : गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च, पाचोरा येथील डी.फार्म. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालात उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.

डी.फार्म. प्रथम वर्षामध्ये कु. मयुरी महाले हिने 85 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे धुळे, जळगाव, नंदुरबार व संभाजीनगर या चार जिल्ह्यांमधून अव्वल येण्याचा मान तिने मिळविला. कु. माधुरी परदेशी हिने 82.40 टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. जागृती पाटील हिने 81.30 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवून संस्थेच्या यशात भर घातली.

डी.फार्म. द्वितीय वर्षामध्ये कु. गायत्री पवार हिने 81 टक्के गुणांसह प्रथम, कु. हर्षदा पाटील हिने 80.55 टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. प्रतिभा तेली हिने 80.36 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, युवा नेते अमोलभाऊ शिंदे, सचिव ॲड. जे. डी. काटकर, संयुक्त सचिव प्रा. डॉ. शिवाजी शिंदे तसेच उपाध्यक्ष नीरज मुनोत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य डॉ. मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावरच यश संपादन करता येते. विद्यार्थ्यांनी या यशावर न थांबता उच्च शिक्षण व करिअरमध्येही उत्कृष्ट कामगिरी करून संस्थेचे नाव अधिक उज्ज्वल करावे.”

या यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च ही संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विश्वासार्ह केंद्रबिंदू असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..