२८ एप्रिलला कृष्णापुरीत मोफत ‘पूर्ण बॉडी चेकअप’ शिबिर; नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा:कृष्णापुरी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून उद्या, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी मारोती मंदिर येथे मोफत पूर्ण बॉडी चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत हे शिबिर पार पडणार असून, परिसरातील सर्व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेविकापती अशोक (आप्पा) पुंडलिक पाटील, नगरसेविका सुरेखा अशोक पाटील तसेच नगरसेवक प्रदीप भगवान वाघ यांच्या पुढाकारातून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या शिबिरात महिलांसाठी महिला डॉक्टर उपलब्ध असणार असल्यामुळे महिलांनीही निर्धास्तपणे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कृष्णापुरी व पंचक्रोशीतील गरीब व गरजू नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी, त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी व्हावी आणि आजारांचे वेळेवर निदान व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होते, त्यामुळे अशा शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जात आहे.
तरी कृष्णापुरी परिसरातील सर्व नागरिकांनी, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांनी, या मोफत बॉडी चेकअप शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..