बळीराजाच्या शेतात विकासाची वाट; पहाण येथे शेतपाणंद रस्त्याच्या कामाचे आज शुक्रवारी भूमिपूजन

राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक ठरणारा मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत रस्ता कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शुक्रवार, दि. ०१ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा परिषद शाळा, पहाण (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथे आयोजित करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील शेतीमाल वाहतूक, शेतात जाण्या-येण्याची सुविधा आणि दळणवळणाची समस्या दूर करण्यासाठी हा रस्ता अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून शेतपाणंद रस्त्याच्या मागणीला आता प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपात सुरुवात होत असल्याने हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी विकासाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील हे राहणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बांधकाम विभागाचे उपअभियंता सतीश शिसोदे, माजी जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंग पाटील, सुनील पाटील, रविंद्र गीते, मनोज राऊळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असताना शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी योग्य रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाळ्यात चिखल, खराब रस्ते आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, पहाण परिसरातील या कामामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..