गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले पोलीस कर्मचारी राहुल सोनवणे यांना पोलीस महासंचालक पदक उत्कृष्ट तपास, धडाकेबाज कारवाया आणि कायदा सुव्यवस्थेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात आपल्या धडाकेबाज तपास कौशल्याने आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करणाऱ्या कार्यपद्धतीने ओळख निर्माण करणारे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री राहुल सोनवणे यांना उत्कृष्ट तपास कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पोलीस दलासह जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री राहुल सोनवणे यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सेवा बजावत असताना अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास अत्यंत कुशलतेने हाताळला आहे. विशेषतः पाचोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना त्यांनी मोटरसायकल चोरी, रॉबरी, घरफोडी यांसारख्या अनेक गुन्ह्यांचा छडा लावत गुन्हेगारांना जेरबंद केले होते. त्यांच्या तपास कौशल्यामुळे अनेक प्रकरणांना यशस्वीरीत्या उकल मिळाली होती.
यानंतर त्यांची बदली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे झाल्यानंतरही त्यांनी आपली धडाकेबाज कामगिरी कायम ठेवली. चाळीसगाव शहरातील अनेक मातब्बर गुंडांवर कारवाई करत त्यांना अटक करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मोटरसायकल चोरी, रात्रीच्या पेट्रोल चोरी, घरफोड्या तसेच विविध गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना अटक करून त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
गुन्हेगारांविरोधातील कठोर भूमिका, तपासातील बारकावे ओळखण्याची क्षमता आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेली तत्परता यामुळेच त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाने घेत त्यांना प्रतिष्ठेचे पोलीस महासंचालक पदक प्रदान केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम, डीवायएसपी श्री विजय ठाकूर,चाळीसगाव शहर पोलिस निरीक्षक श्री अमितकुमार मनेर तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
पोलीस दलातील प्रामाणिकपणा, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा जपणारे अधिकारी म्हणून राहुल सोनवणे यांचे नाव आज जिल्ह्यात विशेष आदराने घेतले जात असून त्यांच्या या यशामुळे तरुण पोलीस कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..