विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारे आदर्श मुख्याध्यापक गजानन सोमवंशी सर आज सेवामुक्त
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
गिरणाई शिक्षण संस्था, पाचोरा संचलित कै. परशराम कोंडिबा शिंदे माध्यमिक विद्यालय, पाचोरा येथील आदरणीय मुख्याध्यापक श्री. गजानन विनायक सोमवंशी सर हे नियत वयोमानानुसार तब्बल ३३ वर्षांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक व विद्यार्थीकेंद्री सेवेनंतर गुरुवार दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना सोमवंशी सरांनी केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व घडविणारे प्रेरणास्थान म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्यकाळात विद्यालयात शिस्त, गुणवत्ता, संस्कार व शिक्षणातील सातत्य यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देत त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
त्यांच्या शांत, संयमी, अभ्यासू व कर्तव्यदक्ष स्वभावामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच समाजात त्यांच्याबद्दल विशेष आदराची भावना निर्माण झाली. ३३ वर्षांच्या अखंड सेवेनंतर ते आज सेवामुक्त होत असले तरी त्यांच्या कार्याचा ठसा कायम प्रेरणादायी राहणार आहे.
त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त विद्यालय परिवारात भावनिक वातावरण निर्माण झाले असून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी व दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
- शुभेच्छुक -
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पाचोरा
Comments
Post a Comment