कृष्णापुरीचा सुपुत्र राज्यभर झळकला !सहाय्यक आयुक्त याऊद्दीन खाटीक यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर; पाचोराच्या शिरपेचात मानाचा तुरा

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण ठरावा अशी बातमी समोर आली असून, येथील सुपुत्र तथा जागृती विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सध्या सहाय्यक आयुक्त (गुप्तवार्ता) पदावर कार्यरत असलेले श्री. याऊद्दीन खाटीक यांना महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांकडून प्रतिष्ठेचे “पोलीस महासंचालक पदक (DGP Medal)” जाहीर झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण पाचोरा शहरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि अत्यंत दक्षतेने बजावलेली सेवा याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना हा मानाचा सन्मान बहाल केला आहे. गुप्तवार्ता विभागासारख्या अत्यंत संवेदनशील आणि जबाबदारीच्या विभागात कार्यरत असताना श्री. खाटीक यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये मोलाची भूमिका बजावत राज्याच्या सुरक्षेसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या सेवाभाव, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि जनतेप्रती असलेल्या सकारात्मक दृष्टीकोनामुळेच त्यांना हा बहुमान मिळाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
कृष्णापुरीसारख्या सामान्य वस्तीतून पुढे येत राज्यस्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे याऊद्दीन खाटीक हे आज युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. जागृती विद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिक्षकवृंद, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“पाचोरा शहरातील व्यक्तीने आपल्या प्रामाणिक सेवेमुळे राज्यस्तरीय सन्मान पटकावणे ही प्रत्येक पाचोराकरासाठी अभिमानाची बाब आहे,” अशा भावना नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
श्री. याऊद्दीन खाटीक यांनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि निस्वार्थ सेवेमुळे हे सिद्ध करून दाखवले आहे की, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा यांच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते. त्यांच्या या यशामुळे नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा मिळणार असून पाचोरा शहराच्या नावाला राज्यभर नवी ओळख मिळाली आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..