विशेष मोहिमेत पोलिसांचा धडाकेबाज अॅक्शन : अवैध धंदे, वाळू चोरी, फरारी आरोपींवर मोठी कारवाई
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
दि. 28 एप्रिल 2026 रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत पोलिस प्रशासनाने विविध ठिकाणी धडक कारवाया करत अवैध धंदे, अमली पदार्थ, वाहतूक नियमभंग, फरारी आरोपी तसेच महिला व बाल सुरक्षा संदर्भात व्यापक मोहीम राबविली. या मोहिमेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचा ठोस संदेश देण्यात आला आहे.
अवैध शस्त्रे व दारूबंदी कारवाई अंतर्गत गावठी हातभट्टी दारू प्रकरणी एकूण 05 गुन्हे दाखल करण्यात आले असून अंदाजे 1 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच जुगार कायद्यान्वये 02 कारवाया करण्यात आल्या.
बी.पी. अॅक्ट कलम 124 अंतर्गत लुबी कंपनीची मोटार जप्त करण्यात आली असून आरोपी शेख समीर मन्सूर, रा. हनुमान नगर याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच बी.पी. अॅक्ट कलम 122 अंतर्गत शेख नईम शेख अमीर, वय 28, रा. बाहेरपुरा याच्यावर देखील कारवाई करण्यात आली.
वाळू चोरी प्रकरणी गुरनं. 197/26, BNS 303(2) अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली असून सुमारे 4 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय NBW-05 व BW-04 अशा प्रलंबित वॉरंटची अंमलबजावणी देखील करण्यात आली.
अमली पदार्थ व प्रतिबंधित वस्तूंविरोधातील मोहिमेत COPTA अंतर्गत 15 कारवाया करण्यात आल्या असून एकूण 3 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहतूक नियमभंगाविरोधात MV Act 185 अंतर्गत दोन कारवाया करण्यात आल्या. यामध्ये विनोद धोंडू चंदनशिवे, रा. सारोळा तसेच नितीन राजू कोळी, रा. डोंगरगाव यांच्यावर कारवाई करण्यात आली.
तसेच बुलेट सायलेंसर, फॅन्सी नंबर प्लेट व इतर नियमभंग प्रकरणी एकूण 20 केसेस दाखल करण्यात आल्या असून त्यापैकी 01 बुलेट सायलेंसर व 06 फॅन्सी नंबर प्लेट संदर्भातील कारवाया आहेत.
फरारी आरोपी शोध मोहिमेत तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बी.पी. अॅक्ट कलम 142 अंतर्गत प्रकाश दुधा राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला व बाल सुरक्षा मोहिमेंतर्गत 05 लॉजिंगची तपासणी करण्यात आली. तसेच ‘मुस्कान मोहिमे’ अंतर्गत महिला व मुलींचा शोध घेण्यात यश आले असून मिसिंग क्र. 9/26 मधील सोनाली महेंद्र सोनवणे (वय 18), मिसिंग क्र. 10/26 मधील निरूबाई ठाकरे (वय 35) तसेच मिसिंग क्र. 32/26 मधील हर्षदा सोनार (वय 21) यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
याशिवाय Eve Teasing संदर्भात 07 कारवाया करण्यात आल्या असून महिला सुरक्षेला प्राधान्य देत पोलिस प्रशासन सतर्क असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
प्रतिबंधक कारवाई अंतर्गत BNS 126 अंतर्गत 02, BNS 128 अंतर्गत 01 तसेच BNS 129 अंतर्गत 01 कारवाई करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment