सु.भा.पाटील पाचोरा शाळेतील विद्यार्थी… विधान वाघ आणि लक्ष्मी वाघ यांची छ.शिवाजी महाराज चौकात राजमाता जिजाऊ व बाल शिवरायांची दिमाखदार वेशभूषा; पाचोरा तालुक्यात कौतुकाचा वर्षाव…


पाचोरा तालुक्यात आज अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विधान वाघ आणि लक्ष्मी वाघ यांनी अनुक्रमे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालरूपाची देखणी, आकर्षक आणि दिमाखदार वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पारंपरिक पोशाखातील बारकावे, डोक्यावरची पागोटे, दागिने आणि चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास यामुळे उपस्थितांना जणू इतिहास प्रत्यक्ष समोर उभा असल्याचा भास झाला. लहानग्यांच्या निरागसतेतून झळकणारी तेजस्वी छबी पाहून नागरिक भारावून गेले.

या वेशभूषेची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली असून, दोन्ही मुलांवर कौतुकाचा अक्षरशः वर्षाव होत आहे. छ.शिवाजी महाराज चौकात अनेकांनी त्यांच्यासोबत छायाचित्रे काढत आनंद व्यक्त केला. इतिहासाविषयी प्रेम आणि संस्कार जपणाऱ्या या उपक्रमामुळे सर्वत्र अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

विधान वाघ आणि लक्ष्मी वाघ हे श्री. कोमल मधुकर वाघ सर आणि प्रा. जयश्रीताई वाघ मॅडम यांची सुपुत्र–सुपुत्री असून, त्यांच्या संस्कारांचे आणि प्रेरणेचे हे सुंदर प्रतिबिंब असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद