कोळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
कोळगाव प्रतिनिधी
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था संचलित गो. पु. पाटील विद्यालय व कला व विज्ञान महाविद्यालय, कोळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९/०२/२०२६ वार गुरुवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश आनंदा कोळी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. ए. एच. पवार, पर्यवेक्षिका श्रीमती एस. पी. शिसोदे तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप बाविस्कर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment