पाचोरा येथे वरखेडी रोड वरील जगन्नाथ (इस्कॉन) मंदिर येथे जगन्नाथ महाराज रथयात्रा महोत्सवात पाचोरा पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक पवार साहेब यांनी बालगोपाळांमध्ये टाळ मृदुंग वाजून हरे रामा हरे कृष्णाच्या जयघोष करीत आनंद व्यक्त केला...




(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
 पाचोरा येथील वरखेडी रोडवरील इस्कॉन मंदिर चे मालक सुरेश मोर ,रमेश मोर सुनील मोर या परिवाराने इस्कॉन मंदिर येथे जगन्नाथ महाराज यांचे मंदिर स्थापन करून पाचोरा शहर व आजूबाजूच्या परिसराकरीता एक देवस्थान निर्माण करून त्या ठिकाणी देवस्थानचे दर्शन घेण्याकरता दर रविवारी अनेक परिवार येत असतात. या ठिकाणी दरवर्षी जगन्नाथ महाराज रथयात्रा निघत असून यावर्षी जगन्नाथ रथयात्रा महोत्सवामध्ये पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  अशोक पवार साहेब यांच्या हस्ते रथयात्रा मध्ये नारळ फोडून तसेच रथ  वाढण्यासाठी असंख्य नागरिक व महिला सोबत अशोक पवार साहेब व त्यांची अर्धांगिनी यांनी रथाची दोरी ओढून दर्शनाचा लाभ घेतला. तसेच यावेळी  अशोक पवार साहेब बालगोपाळ मंडळी व जगन्नाथ महाराज मंदिर चे भक्तगण यांच्यासोबत टाळ मृदुंग वाजवून आनंद व्यक्त केला. तसेच हरे रामा हरे कृष्णाच्या जयघोष करून पोलीस मध्ये माणुसकी असते याचे दर्शन घडवले तसेच  अशोक पवार साहेब अत्यंत धार्मिक असून नेहमी देव धार्मिक कार्यक्रमाला आवर्जून  हजर असतात. आज त्यांच्यासोबत  सुरेश मोर ,रमेश मोर,सुनील  सुभाष अग्रवाल  प्रा सी एन चौधरी सर, सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले जयेश कोटेचा , सुजित तिवारी , श्रीराम पाटील  राजेश पटवारी ,पत्रकार  राजेंद्र खैरनार  निखिल मोर  दिलीप पाटील , मुन्ना अग्रवाल भरत तिवारी तसेच किशोर वर्मा डॉक्टर माळी डॉक्टर भरत प्रजापत , न्याती , योगेश धामणगावकर महाराज,व्यापारी वर्ग महिला वर्ग यावेळी उपस्थित होते या रथ यात्रेचा समारोप श्री जगन्नाथ मंदिर येथे आरती होऊन सर्व भक्त जणांना प्रसाद देण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..