येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका ह्या निवडणुकीत निष्ठावंत व काम करणाऱ्या व्यक्तींना तन-मन-धन पासून सहकार्य करा आमदार किशोर आप्पा पाटील यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
पाचोरा येथील प्रसाद हाॅल येथे शिवसेनेचा दिनांक २८/६/२०२५ शनिवारी भव्य निर्धार मेळावा आयोजित केला होता. या मेळावा मध्ये असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनेक नेत्यांनी मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. एकही कार्यकर्ता भाड्याचा किंवा रोजंदारीचा नव्हता प्रचंड अशी गर्दी पाहून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की ,माझ्यासाठी जेवढे तुम्ही तर मनाने काम केले व मला भरगच्च मतांनी निवडून सहकार्य केले त्याची परतफेड मी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपालिका ,ग्रामपंचायत मध्ये सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना व महिला वर्ग यांना तिकीट देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी तन-मन-धन लावून सहकार्य करणार या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.एकनाथरावजी शिंदे यांच्या पाठीशी राहून जास्तीत जास्त संख्येने सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कार्यकर्त्यांना गाफील न राहता जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच आपल्याकडे कार्यकर्त्यांचा ओढ लागला असून अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षात प्रवेश करीत आहे त्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.
यावेळी युवानेते सुमित दादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील ,युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन,सभापती गणेश पाटील,उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर ,शेतकी सेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील,शिवशक्ती,भीमशक्ती जिल्हाप्रमुख प्रवीण ब्राह्मणे,एस.टी.सेना जिल्हाप्रमुख नरेश पाटील ,माझी नगराध्यक्ष संजय गोहिल ,तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील,विनोद तावडे,शहरप्रमुख सुमित सावंत,अनिल पाटील,सूरज शिंदे,गणेश चौधरी ,योगेश पाटील,डॉ भरत पाटील,इंदल परदेसी,दीपक पाटील,शरद पाटे,संजय एरंडे,शालीग्राम मालकर,दत्ता जडे,रवी पाटील,बापू हटकर सर्व पदाधिकारी ,शिवसैनिक ,युवा सैनिक, सौ ललिता ताई पाटील, सौ. स्मिता बारवकर, सौ.मंदाबाई पाटील, सौ सुषमा पाटील ,सौ.रंजना पुजारी, सौ.शुभांगी येवले, सौ. मंदाकिनी पारोचे ,स्मिता सुखदेव, सौ. मायाताई सौ.बेबाताई,सौ. भाग्यश्री पाटील , सौ. मोहिनी देशमुख, सौ. कामिनी पाटील इ.महिला आघाडीच्या पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment