पारोळा तालुक्यातील सुमठाणे खुनातील महिलेची ओळख पटली संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात खुनाचे कारण उलगडणार...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
अमळनेर प्रतिनिधी:
अमळनेर : पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात महिलेचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला होता. त्या महिलेची ओळख पटली असून तिचे नाव शोभाबाई रघुनाथ कोळी वय ४८ रा उंदिरखेडा ता पारोळा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पैश्यांच्या वादातून आणि इतर कारणाने तिचा खून करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.*
     🟦 मयत महिलेची कुठेही हरवल्याची नोंद नसल्याने पोलिसांपुढे मोठे आवाहन होते. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , डीवायएसपी विनायक कोते यांनी पोलीस निरीक्षक सचिन सानप , सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन , पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे , हेडकॉन्स्टेबल शरद पाटील , महेश पाटील ,सुनील हटकर , आशिष गायकवाड , अनिल राठोड , संदीप सातपुते , अभिजित पाटील ,मिथुन पाटील , महेंद्रसिंग राजपूत , सविता पाटील यांच्या पथकाला खुनाचा तपास करण्यास सांगितले. 
   🟨   शोभाबाई ही धुनी भांडी करत होती. ती तिचा मुलगा गोपाळ कोळी यांच्यापासून वेगळी राहायची. मुलगा कामासाठी सुरत गेला होता. घरमालकाने गोपाळ ला फोन करून कळवले होते की तुझी आई तीन दिवसांपासून कामावर आली नाही. गोपाळ गावाकडे आला आईचा शोध घेत असताना  त्याला पोलीस पाटलाने मयत महिलेचा फोटो दाखवला असता त्याला ओळख पटली. त्यांनतर पोलिसांनी तांत्रिक आधारावरून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..