भडगाव येथे आज दि.18 मार्च 2025 मंगळवार रोजी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली"जागतिक ग्राहक दिन" संपन्न

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भडगाव प्रतिनिधी: आज दि.18/03/2025 रोजी तहसिल कार्यालय भडगांव येथे मा. श्रीमती शितल सोलाट तहसिलदार भडगांव यांचे अध्यक्षतेखाली जागतीक ग्राहकदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा सुरेश कोळी होते  कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमात शासन आदेशा नुसार लोकगीत व पथनाट्रय यांचा समावेश करण्यात आला शाहीर परमेश्वर सुर्यवंशी व त्याची टिम यांनी “शास्वत जिवन शैली कडे न्याय संक्रमण ” या यंदाच्या थिम वर व ई.के.वाय सी या दोन बाबीवर पथनाट्रय सादर करुन उपस्थितांना मंत्रमुक्त केले यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष श्री. अनिल देशमुख (पाचोरा ) यांनी शास्वत जीवनशैली संबंधी विविध उदाहरणं देत या विषयां वर मार्गदर्शन केले
 या कार्यक्रमास पुरवठा निरीक्षक श्री. डी व्ही. अमृतकार, गोदाम व्यवस्थापक श्री. एस. एस. गढरी पुरवठा लिपीक श्री. एस. आर. पाटील व श्री. एम. एस. निकम, चेतन पाटील,अखिल भारतीय ग्राहक संस्था जिल्हाध्यक्ष श्री. अनिलजी देशमुख जिल्हा कार्य कारीणीतील श्री गिरीश दुसाने श्री. सुधाकर पाटील अखील भारतीय ग्राहक पंचायतचे भडगाव तालुका अध्यक्ष भडगांव श्री. सुरेश रोकडे, प्रा सुरेश कोळी, दिनेश पाटील, आकाश पाटील, निलेश बडगुजर, गणेश अहिरे,रास्त भाव दुकानदार संघटनेचे श्री. जयवंत पाटील व मोठ्रया संख्येने रेशनदुकानदार व नागरीक व अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य, पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व समारोप श्री. डी. व्ही. अमृतकार यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..