पाचोऱ्यातील अतिक्रमित घरे मोजणी प्रक्रियेला शुक्रवारी आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते सुरुवात...! पाचोरा शहरातील सुमारे 3500 अतिक्रमित मालमत्ता धारकांना मिळणार लाभ..!!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा (वार्ताहर) 30/01/2025
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार नगर परिषद प्रशासनाने पाचोरा शहरातील शासकीय जागेवरील सुमारे 3500 अतिक्रमित घरे नियमानुकूल करून नावावर लावण्या बाबतची कार्यवाही सुरू होत असून शुक्रवारी सकाळी 10 वाजता शहरातील जनता वसाहत भागातील धम्मोदय बौद्ध विहार भागातून मोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 
पाचोरा शहराचे काही टप्पे केले असून पहिल्या टप्यात शहरातील जनता वसाहत भागातील सुमारे 250  घरांच्या मोजणी होणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे अतिक्रमित घरे नावावर होण्याची आस लाऊन बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
    शासनाचे 2011 पूर्वीची सरकारी जमिनीवरील रहिवासी क्षेत्रातील घरांचे अतिक्रमण नियमनाकुल करण्याचे धोरण आहे. मात्र याबाबत कार्यवाही होत नसल्याने अतिक्रमण धारकांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांची भेट घेत विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा व भडगाव शहर हद्दीतील सर्वच शासकीय जागेवरील अतिक्रमित धारकांची घरे नावावर लावण्याबाबत शासकीय आदेशाप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशित केल्याने पाचोरा नगरपरिषद प्रशासनाने आवश्यक मोजणी फी भरून मोजणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. दरम्यान पाचोरा व भडगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील सुमारे सात हजार अतिक्रमण घरे असून टप्प्याटप्प्याने ही घरे नावावर लावण्यात येणार आहेत. मोजणी प्रक्रियेसाठी स्वतः मुख्याधिकारी मंगेश चव्हाण, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक एम व्ही तोटावार, शहर अभियंता भय्यासाहेब पाटील,पालिकेचे उपमुख्याधिकारी डी एस मराठे,दुर्गेश सोनवणे, नगररचना विभागाचे धीरज नेटके यांचेसह भूमिअभिलेख व नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती असणार आहे.तरी अतिक्रमित मालमत्ता धारक बांधवानी या मोजणी प्रक्रियेत सर्व कर्मचारी वर्गाला सहकार्य करून मोजणी प्रक्रिया सुलभपणे पार पाडून घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले आहे. 
*चौकट*
विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दिशेने आपण पाऊल टाकले असून पाचोरा व भडगाव शहर नगरपालिका हद्दीतील अतिक्रमित घरे नावावर लावण्याची प्रक्रिया नगरपरिषदेने सुरू केली असून टप्प्याटप्प्याने  पाचोरा व भडगाव शहरातील सरकारी जागेवरील सुमारे सात हजार मालमत्ता धारकांना त्याचा लाभ होणार आहे. यामुळे गोरगरीब जनतेला आपण लाभ मिळून देणार असल्याचे आपल्याला मनस्वी समाधान आहे.
*आ.किशोर आप्पा पाटील*
आमदार पाचोरा भडगाव

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद