"आशिर्वाद कम्प्युटर्स" चा आई-वडीलांच्या आशिर्वादाने केला श्रीगणेशा...,विद्यार्थ्यांना घडवून उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल धुळे येथे MKCL तर्फे सन्मानित करण्यात आले.


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील श्री अतुल शिरसमणे  आणि दिनेश शिरसमणे यांनी 1 जानेवारी 1999 रोजी आई-वडिलांच्या आशीर्वादाने आशिर्वाद कम्प्युटर्स सुरू केले. आई-वडिलांचा आशीर्वादाला साजेसे कॉम्प्युटर सेंटरचे नाव सुद्धा आशिर्वाद कम्प्युटर्स असे ठेवले. कॉम्प्युटर सेंटर एका छोट्याशा भाड्याच्या जागेत एक- दोन विद्यार्थी, आणि 1 संगणक पासून सुरु केले. क्लासेसला येणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पद्धतीने देत आलेले शिक्षण, कॉम्प्युटर क्षेत्राला मिळत असणारा प्रतिसाद यामुळे सर्व विद्यार्थ्या संगणक प्रशिक्षणासाठी "आशिर्वाद" कडे आकर्षित होत गेले,आणि आशिर्वाद कम्प्युटर्स सेंटरमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या वाढत गेली. त्यामुळे श्री अतुल शिरसमणे यांनी स्व:ताच्या जागेत 40 पेक्षा अधिक अत्याधुनिक कॉम्पुटर असलेले सेंटर उभारले. त्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना भविष्यातील कॉम्प्युटर क्षेत्र ही काळाची गरज असून कॉम्प्युटरला प्रचंड महत्त्व राहणार असल्याने सर्वांनी कॉम्प्युटर ज्ञान घेणे आवश्यकच आहे. त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा कॉम्प्युटर परीक्षा साठी विद्यार्थ्यांना प्रोस्ताहित केले. 1 जानेवारी 1999 रोजी अत्यंत बिकट व प्रतिकूल परिस्थितीत "आशिर्वाद कम्प्युटर्स" संचालक श्री अतुल शिरसमणे यांनी संगणक प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. पूर्वी कुठलीही व्यावसायिक पार्श्वभूमी व आर्थिक पाठबळ नसताना आपल्या जिद्द चिकाटी व मेहनतीने तसेच आपल्या अभ्यासू वृत्तीने कॉम्प्युटर क्षेत्रात विद्यार्थी विद्यार्थिनींना कॉम्प्युटर क्षेत्राचे ज्ञान देत विद्यार्थी घडवले. त्यांचे विद्यार्थी आज विविध पदावर व विविध क्षेत्रात अधिकारी झालेले असून आज आशिर्वाद कम्प्युटर्स चे पाचोरा शहर व परिसरात नाव लौकिक आहे. 
नुकत्याच धुळे येथे पार पडलेल्या MKCL च्या Regional Meet  मध्ये  MKCL च्या व्यवस्थापकीय संचालक आदरणीय विना कामत मॅडम यांच्या हस्ते आशिर्वाद कम्प्युटर्स चे संचालक अतुल शिरसमणे व मंजुश्री शिरसमणे यांना गौरविण्यात आले. उत्तर महाराष्ट्र विभागातील सन 2024 मधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या MS-CIT केंद्र चालकांचा सत्कार समारंभ यावेळी पार पडला. याप्रसंगी MKCL चे Chief Regional Manager आ. अतुल पतोडी सर, अमित रानडे सर, नटराजन सर, RM निलेश तवर सर,MKCL NM चे श्री संतोषजी बिरारी व सौ कविता बिरारी, जैस्वाल सर, उमाकांत बडगुजर सर, चव्हाण सर, राहुल सर, आणि जळगाव, धुळे, नंदुबार जिल्ह्यातील MKCL चे ALC बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 1 जानेवारी होणाऱ्या वर्धापन दिना निमित्त आशिर्वाद कम्प्युटर्स आणि टीम ला मनपूर्वक शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..