पाचोरा वकील संघाच्या "उपाध्यक्ष पदी" ॲड.सौ कविता मासरे(रायसाकडा) मॅडम यांची बिनविरोध निवड करण्यात आली, महिला भगिनींसाठी ही अभिमानास्पद बाब!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा वकिल संघाच्या "उपाध्यक्ष" पदासाठी कोणताही प्रतिस्पर्धी नसल्याकारणाने त्यांची "बिनविरोध" निवड करण्यात आली आहे. ही निवड पाचोरा तालुक्यामधील वकील संघात हर्षाचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. येणाऱ्या ३१ डिसेंबर२०२४ मंगळवारी ही निवडणूक पार पडत आहे, परंतु "उपाध्यक्ष"पदाकरीता ॲड.सौ.कविता मासरे(रायसाकडा) मॅडम यांच्या विरुद्ध कोणीही फॉर्म दाखल करत नसल्याने ॲड.सौ.कविता मासरे(रायसाकडा) मॅडम यांची दि.२४/१२/२०२४ मंगळवारी  दुपारी बिनविरोध निवड झाली असून पाचोरा वकिल संघामध्ये इतिहासामध्ये  पहिल्यांदा "महिला" उपाध्यक्ष होण्याची संधी ॲड. सौ.कविता मासरे(रायसाकडा) मॅडम यांना मिळाली आहे. ही सर्व महिला वर्गात अभिमानास्पद बाब आहे.

कविता मासरे यांनी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीत अनेक यशस्वी प्रकरणे हाताळली आहेत. त्यांच्या या क्षमतेबद्दल वकील वर्तुळात मोठे समाधान आहे. त्यांच्या निवडणुकीमुळे वकील संघाला नवी ऊर्जा मिळणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली वकील संघ अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच पाचोरा-भडगावचे लोकप्रिय कार्यसम्राट हॅट्रीक आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ही अभिनंदनाचे लेटर देऊन शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..