आदर्श व अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रा. सी. एन. चौधरी, सेवानिवृत्त प्राध्यापक तथा जेष्ठ पत्रकार यांच्या वाढदिवसा बद्दल विशेष एक लेख....
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा ज्येष्ठ पत्रकार प्रा. सी. एन. चौधरी यांचा आज वाढदिवस . . .
त्यानिमित्ताने या आदर्श व अष्टपैलू व्यक्तिमत्वास शतकी जीवनाच्या 💐शुभेच्छा💐पत्रकारितेच्या माध्यमातून जनसेवेचा वसा घेवुन जनसामान्यांना न्याय देऊन व पत्रकारिता काय असते ? याचे ज्ञान इतर पत्रकारांना देण्याचा प्रयत्न करणारे सी. एन.चौधरी पाचोरा शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्हयात पत्रकारितेतील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. अभ्यासू व तालुक्याची संर्वागीण माहिती असलेले प्रा. चौधरी सर यांनी गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारिता करीत असून त्यांनी लोकमत व सकाळ या पेपरला काम करून चांगल्या बातम्या छापून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पाचोरा कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करीत असताना कधीही त्यांनी पत्रकारितेचा दुरुपयोग केला नाही. पत्रकारीतेच्या माध्यमातून कॉलेजमधील विविध समस्या तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कुठलीही बातमी असो तिची पूर्ण सत्यता तपासल्या शिवाय बातमी न लावणे. पत्रकारितेच्या माध्यमातून माणसे जोडणे. कोणाचे मन दुखवणार नाही असे न वागणे. या त्यांच्या आगळ्यावेगळ्या वैशिष्टांमुळे त्यांचे नाव सर्वच क्षेत्रातील लोक मोठ्या आदराने घेतात.
सकाळ पेपरच्या माध्यमातून विविध क्षेत्रातल्या व राजकीय , सामाजिक तसेच जनसामान्यांच्या न्यायाच्या बातम्या प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात. कधीही कोणत्याही आर्थिक मोबदल्याची आशा न ठेवता सर्वांना न्याय देण्यासाठी झटतात.
त्यांचे वय 65 वर्ष असले तरी तरुणांना देखील लाजवेल अशी चपळता व तडफदारी त्यांच्यात आहे. चेहऱ्यावर नेहमी हास्य , सदाबहार , दिलदार व्यक्तिमत्व. कुठल्याही व्यक्तीबद्दल लिखाण करायचे असल्यास त्यांना संपूर्ण त्या परिवाराचा अभ्यास असतो त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात त्यांना मान सन्मान मिळतो. पत्रकारिता कशी असावी व करावी ? यासंदर्भात सुद्धा वेळोवेळी सूचना देत असतात.अशा या आदर्श व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस असून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🌹🎂.
Comments
Post a Comment