*आळंदी येथील प्रोत्साहन फाउंडेशन तर्फे पाचो-यातील लाडशाखीय वाणी समाजाच्या धडाडीच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या सौ नीता शेंडे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित*
![]() |
आळंदी येथील प्रोत्साहन फाउंडेशन तर्फे पाचो-यातील लाडशाखीय वाणी समाजाच्या धडाडीच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या सौ नीता शेंडे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!
मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील लाडशाखीय वाणी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या व एक अभ्यासू नेतृत्व कर्तुत्व आणि दातृत्व असलेल्या महिला सौ.निता प्रविण शेंडे यांनी समाजासाठी समाजपयोगी कार्यक्रम राबवून एक चांगले नेतृत्व सिद्ध केले आहे सौ.निता शेंडे यांना कविता वाचन लेख लिहिण्याचा छंद असून त्यांनी त्या माध्यमातून अनेक कविता व लेख तयार केलेले आहे. व त्या उन्नती महिला पतसंस्थेचे संचालक पदी पण विराजमान आहेत.तसेच सूत्रसंचालन सुद्धा अती उत्तम रितीने करतात त्यांची भाषाशैली अत्यंत साधी सरळ असून त्यांनी आपल्या कलेतून अनेक गोष्टी चांगल्या साध्य केले आहे घरसंसार सांभाळून तसेच आपल्या पतीचे मेडिकल च्या व्यवसायाला हातभार लावून मदत करीत असतात. तसेच वेळात वेळ काढून विविध क्षेत्रातील जनरल नॉलेज आत्मसात करण्यासाठी ते नेहमी सर्व पुस्तक वाचन करत असतात .सौ.निता शेंडे ह्या अनेक पुरस्काराने सन्मानित झालेल्या असून डॉक्टर किसनराव पाटील खानदेश "स्थैर्य वाड्मय पुरस्कार 2024" पाखराची शाळा या बालकाव्य संग्रह पुरस्कार देण्यात आला होता. द्वितीय पुरस्कार "खान्देशी आई" या कवितेस शब्द शिल्प कलाविष्कार संघ यांच्याकडून "विशेष प्राविण्य" पुरस्कार देण्यात आला होता. तिसरा पुरस्कार "प्रेमाची अक्षरे" साहित्य समूह मध्ये त्यांना पुरस्कार देण्यात आला होता. तसेच चित्रलेखन,भागवत गीत, आणि गीत गायन स्पर्धा असे अनेक पुरस्कार मिळालेल्या सौ.निता शेंडे यांना पण सन्मानित करण्यात आले."लाडशाखीय वाणी समाज" मित्र मंडळ संचलित "प्रोत्साहन फाउंडेशन" तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या पुरस्कार सोहळ्यात पाचोरा येथील सुप्रसिध्द गायत्री मेडीकल चे संचालक प्रविणभाऊ शेंडे यांच्या अर्धांगिनी सौ.निता शेंडे यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार आळंदी येथे बहाल करून त्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी त्यांचे पाचोरा शहरातील महिला मंडळ यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केलेले

Comments
Post a Comment