एक थोर कर्मपरायण ऋषितुल्य,भारतीय कृषी क्षेत्राचं स्वरूप पुर्णतः बदलवणारे,पडीक जमिनीला, कोरड्या बरड माळरानावर आपल्या श्रमाघामाने हिरवाईचे स्वरुपात परिवर्तन करणा-या कृषीऋषीच्या भुमीत आम्हा पत्रकारांना अभ्यास द्वारातून जाण्याचं भाग्य लाभले.!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
एक थोर कर्मपरायण ऋषितुल्य,भारतीय कृषी क्षेत्राचं स्वरूप पुर्णतः बदलवणारे,पडीक जमिनीला, कोरड्या बरड माळरानावर आपल्या श्रमाघामाने हिरवाईचे स्वरुपात परिवर्तन करणा-या कृषीऋषीच्या भुमीत आम्हा पाचोरा- भडगाव शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांना काल दिनांक २६/११/२०२४ रोजी अभ्यास द्वारातून जाण्याचं भाग्य लाभले.....
एक थोर कर्मपरायण ऋषितुल्य, भारतीय कृषीक्षेत्राचं स्वरूप पूर्णपणे बदलवणारं, दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व... कोरडवाहू जमिनीला निसर्ग समृद्धता देणारे आणि पडीक जमिनीचे सृजनशील भूमीत परिवर्तन करणारे प्रयोगशील भूमिपूत्र. आर्थिकदृष्ट्या सामान्य शेतकऱ्यांचं सर्वांगीण जीवनमान उंचावण्यासाठी आपल अवधं आयुष्य समर्पित करणारे ध्येयदर्शी उद्योजक. कोरड्या बरड माळरानावर श्रमाघामानं हिरवाईचं लेणं निर्माण करणाऱ्या भवरलालजींच्या जीवनमूल्यांप्रती श्रद्धाशील, सुशोभित आणि भावपूर्ण मोजेक कलाकृती अभिनव अभिव्यक्तीसह आणि कलात्मक पद्धतीने साकार केली आहे. ज्या भूमीवर त्यांच्या वत्सल हातांनी  सृष्टीचं सिंचन झालं, त्याचं स्थळी

आगळ्यावेगळ्या स्वरूपातील ही प्रतिमा साकार झाली.

कृतज्ञतापूर्वक आदरांजलीने हे भव्य पोर्ट्रेट आखीवरेखीव आणि तंतोतंत रचण्यात आलं आहे. भाऊंनी ज्या पाईप्सच्या माध्यमातून कृषी उद्योजकीय कारकिर्दीचा पाया। रचला, त्या पाईप्सपासून ही कलाकृती मोजेक स्वरूपात साकार केली आहे. हासुद्धा एक अपूर्व योगच म्हणता येईल की, हेच ते पाईप्स आहेत, जे पाण्याच्या प्रमाणशीर प्रवाहासह आपल्या भूमीला सुजलाम् सुफलाम् करतात आणि आपल्या देशाचीही तहान तृप्त करून तहानलेल्या प्राणीमात्रांचा आशीर्वाद घेतात.

श्रद्धेय भवरलालजींच्या कार्यसंस्कृतीचा परिपाठ गिरवलेले वरिष्ठ सहकारी प्रदीप भोसले आणि त्यांच्या चमुने रचलेलं हे अनोख पोर्ट्रेट दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ रोजी 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ने प्रमाणित केलेले जगातील सर्वात मोठं जैन पाईप्सद्वारा साकारलेले पोर्ट्रेट आहे. विविध व्यासांच्या पॉलीथिलीन आणि पीव्हीसी पाईप्स वापरून बनविलेल्या या कलाकृतीची रुंदी १२० फूट (३६.५७ मीटर) X व लांबी १५० फूट (४५.७२ मीटर) अर्थात संचयी लांबी २१.९ किलोमीटर आहे.

श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा पाचवा स्मृतिदिन, गुरुवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२१

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..