पत्रकार दिनी अमळनेरात होणार लोककलेचा जागर


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक संदेश उमप सादर करणार लोकगीत; अमळनेरकरांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

अमळनेर : सध्याच्या काळात महाराष्ट्रातील लोकगीत व लोककला लुप्त होतं चालली आहे. यामुळे अनेक कलाकारांना हालाकीचे जीवन जगावं लागत आहे. म्हणून लोकगीत व लोककलेला पुन्हा वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अमळनेर शाखेने जागर लोककलेचा व लोकगीतांचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. 
दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनी अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक विठ्ठल उमप यांचे चिरंजीव गायक संदेश उमप व त्यांचे सहकारी लोकगीत सादर करणार आहेत. तसेच शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुरु असलेली बहिरूपी कला, लावण्या, पोवाळे यांसारख्या कला लोककलाकार सादर करणार असून अमळनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. मी

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..