कवितेने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे बळ दिले.. प्रा.वा.ना.आंधळे लोहारा पंडित विद्यालयात प्रसिद्ध कवी वा.ना.आंधळे यांचे व्याख्यान.
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
लोहारा ता. पाचोरा
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे मराठी साहित्याची मेजवानी या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, गझलकार,ललित लेखक, प्रा. वा ना आंधळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव यु.यु. पाटील होते तर प्रमुख पाहुण्यांमध्ये स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वास पाटील, विकासो चेअरमन प्रभाकर चौधरी,माजी सरपंच कैलास चौधरी,विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अ.अ.पटेल ,आर एस परदेशी, माने सर ,लोहारा येथील पत्रकार चंद्रकांत पाटील,रमेश शेळके, गजानन क्षिरसागर,दिलीप चौधरी, श्रीराम कलाल, विनायक बापू पाटील, म्हसास येथील प्रकाश पाटील,योगेश पाटील तसेच रामेश्वर तांडा येथील सरपंच दत्तू राठोड,भास्कर अंबिकार,सुभाष देशमुख, कडू चौधरी तसेच लोहारा येथील अनेक सन्माननीय मंडळी व भगिनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक वा .ना.आंधळे यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सरस्वती माता व आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला ज्ञानसाधना सर्वोदय मंडळाच्या वतीने सुद्धा प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविक वर भाषणातून मराठी साहित्याची मेजवानी या कार्यक्रमाची रूपरेषा मांडली प्रमुख वक्त्यांचा परिचय वाय पी वानखेडे यांनी करून दिला त्यानंतर ज्ञानसाधना सर्वोदय मित्रमंडळाच्या वतीने सन्मानपत्र प्रमुख पाहुण्यांना देण्यात आले त्याचे वाचन पी यु खरे यांनी केले कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक वा ना आंधळे यांनी आपल्या व्याख्यानातून कवितेचा जन्म कशाप्रकारे होतो कविता कशाप्रकारे मांडता येते याविषयी विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवाच्या शिदोरीद्वारे आपल्या ग्रामीण बोली भाषेत मार्गदर्शन केले तसेच कवितेने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे बळ दिले असे आवर्जून सांगितले.
आई मला जन्म घेऊ दे ही कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली यावेळेस विद्यार्थ्यांनी प्रा.वा ना आंधळे यांच्या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यु यु पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून आंधळे सरांच्या कार्यकर्तृत्वाविषयी गुणगौरव केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील यांनी केले व आभार आर सी जाधव यांनी मानले हा कार्यक्रम ज्ञानसाधना सर्वोदय मित्रमंडळाच्या वतीने विद्यालयात आयोजित करण्यात आलेला होता त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सुद्धा त्यांचे आभार मानण्यात आले हा कार्यक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम व मुख्यध्यापक एस व्ही शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment