अखिल भडगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाची पुरुष आणि महिला शाखा कार्यकारणी भडगाव येथील त्रैवार्षिक अधिवेशनात जाहीर...!!!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
      अखिल भडगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पुरुष आणील महिला कार्यकारिणीचे पुनर्गठन छत्रपती संभाजीराजे सभागृह भडगाव येथे दि.14/12/2024 रोजी शनिवार रोजी संपन्न झाला.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल जळगाव जिल्हा प्राथ.शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे होते.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरचिटणीस देवेंद्र पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष योगेश इंगळे,जिल्हा कोषाध्यक्ष अनिल गायकवाड,जिल्हाउपाध्यक्ष सुनील पाटील, भानुदास पाटील, अनिल चौधरी जिल्हा प्रतिनिधी प्रविण पाटील, नरेंद्र पाटील तालुकाध्यक्ष प्रविण पाटील पाचोरा, राजेंद्र पाटील जळगाव, अविनाश पाटील एरंडोल, प्रविण कोळी पारोळा, किरण पाटील जामनेर, तालुका सरचिटणीस जितेंद्र वानखेडे पाचोरा, किरण मनुरे एरंडोल, दिपक पाटील पारोळा, संजीव सपकाळ जामनेर यांचेसह मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष रामदादा पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
    यावेळेस ग.स.सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजबसिंग पाटील यांचा सत्कार संघटनेमार्फत करण्यात आला. 
    या वेळेस जिल्हा सरचिटणीस देवेंद्र पाटील आणि जिल्हा कार्याध्यक्ष योगेश इंगळे यांनी मार्गदर्शन केले,अध्यक्षीय भाषणात रविंद्र सोनवणे यांनी संघटनेचे महत्त्व आणि कार्यपद्धती विषद केली.ही संघटना सर्व संघटनांची मातृ संघटना आहे आणि जागतिक स्तरापासून ह्या संघटनेचे कार्य सुरू असते असे सांगितले.
      _सदर त्रैवार्षिक अधिवेशनात मध्ये जिल्हा कार्यकारणी मध्ये  जितेंद्र प्रल्हाद पाटील यांची जिल्हाउपाध्यक्षपदी तर अविनाश हरी देवरे, निलेश भास्करराव हिरे,महिला कार्यकारणीत भारती वसंतराव गरुड व सुषमा आधार पाटील यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
▫️ पुरुष कार्यकारणी
अध्यक्ष - विलास संतोष पाटील
सरचिटणीस- प्रविण शिवार सोनार
*कार्याध्यक्ष - योगेश सुभाष शिंपी*
कोषाध्यक्ष - हेमंत माधवराव पाटील
कार्यालयीन चिटणीस - विशाल बळवंतराव वाबळे
व सर्व इतर कार्यकारिणीतील पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
 ▫️  महिला कार्यकारणी
अध्यक्ष - वर्षा विजय पाटील
सरचिटणीस- रंजना विश्वासराव पाटील
कार्याध्यक्ष - दिपाली डिगंबर देशमुख
कोषाध्यक्ष - वैशाली गोरख पाटील
कार्यालयीन चिटणीस - प्रियंका शिवाजी कुमावत
यांची व कार्यकारिणीतील इतर पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
       सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
🌹🌹🌹🌹🌹🌹

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद