मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना कायम स्वरुपी रूजु करावे ह्या मागणी चे आज प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रुजू करावे.
पाचोरा/ प्रतिनिधी
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या व सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना, शैक्षणिक पात्रतेनुसार त्या पदावर कायमस्वरूपी रुजू करावे.या मागणीचे निवेदन भडगाव तहसीलदार , गट विकास अधिकारी भडगाव, पाचोरा भडगाव विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील,व पाचोरा प्रांत अधिकारी यांच्या मार्फत निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे, या योजनेअंतर्गत दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी शासकीय पदावर रुजू करावे.व राज्यात प्रगतीत योगदान देणारे असल्याने योजनेचा हेतू पूर्ण करून भविष्याची दिशा निश्चित करावी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रलंबित असणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या मागण्या सरकारकडून मान्य करावेत, असे निवेदन पाचोरा भडगाव येथील तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले निवेदनावर सह्या भडगाव मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्यक संघटनेचे खालील प्रमाणे प्रशिक्षणार्थी चेतन महाजन,रितेश माळी, तन्मय पाटील, सतीश माळी, रहीम पिंजारी, किरण परदेशी, राहुल नरवाडे, नेहा भोई, काजल पाटील, जितेंद्र परदेशी, आकांक्षा ठोंबरे,लकीचंद पाटील,समाधान बोराडे, शरद वाघ, प्रशांत पाटील, सागर शेजवळकर, गीतेश शेजवळकर, नूतन पाटील, सोपान महाजन, अधिक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..