परभणीत मध्यवर्ती स्थळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ घडलेल्या निंदनीय प्रकाराचा जाहीर निषेध म्हणून निवेदन देण्यात आले


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
प्रती,
मा.जिल्हाधिकारी साहेब
जळगाव

परभणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान व संविधान विरोधी घोषणाबाजी या कृतीचा जाहीर निषेध

परभणी शहरात मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय ते बस स्टँड रोड येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आहे. त्या ठिकाणी असलेल्या भारतीय संविधानाच्या संदेशक प्रतिकृतीची एका माथेफिरू कडून मोडतोड होऊन संविधान विरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर घटनेचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत.प्रथम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून निवेदन देण्यात आले.
मुख्यतः शहरात प्रशासकीय व मुख्य चौक परिसरात अशा पद्धतीने घटना घडते व तेही भारतीय संविधानाच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या सुरुवातीस अशा पद्धतीने विकृत व अवमानकारक कृत्य होत असेल तर आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात खऱ्या स्वातंत्र्यात आहोत काय, हा खरा प्रश्न उभा राहतो. सध्या शहराशहरात जे मोर्चे निघत आहे त्यामुळे कुठेतरी समाज मनात तेढ निर्माण तर होत नाही ना  ? हे देखील तपासणी गरजेचे झाले आहे. त्यामुळे सदर घडलेल्या घटनेची मुळ पार्श्वभूमी तपासून सक्षम यंत्रणे कडून चौकशी होऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी समस्त संविधान प्रेमी व आंबेडकर प्रेमी जनता मागणी करीत आहोत.

प्रत माहितीस्तव 
उपविभागीय अधिकारी पाचोरा 
तहसीलदार, पाचोरा 
पोलीस निरीक्षक, पाचोरा

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..