पाचोरा येथे दत्त जयंती सप्ताहास उत्साहात प्रारंभ....


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा :-
-६५३ सेवेकरी बसले पारायणास
शहर प्रतिनिधी / पाचोरा 
शहरातील संघवी काॅलनी स्थित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात ९ ते १६ डिसेंबर दरम्यान होणार्‍या दत्त जयंती सप्ताहास "डिगंबरा डिगंबरा श्री पाद वल्लभ डिगंबरा" या जयघोषाने उत्साहात प्रारंभ झाला. श्री गुरूचरित्र पारायणा साठी ६५३ महिला, पुरुष, तरुण, तरुणी सेवेकरी बसलेले असून हवन युक्त पारायणासाठी ११ महिला सेवेकरी सेवा रूजू करित आहे. यासोबतच प्रातिनीधी स्वरूपात नवनाथ व सुलभ भागवत सेवा रुजु करण्यात येतआहे.
    शहरातील संघवी काॅलनी स्थित दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात सुरू झालेल्या या सप्ताहात दररोज सकाळी ८ वाजेच्या भुपाळीच्या आरती नंतर नित्य स्वाहाकार विविध प्रकारचे याग यात प्रामुख्याने मंडल स्थापना, अग्नि स्थापना, स्थापित देवता हवन, बलीपुर्णाहुती, गणेश याग, मनोबोध याग, स्वामी याग, गिताई याग, चंडी याग, रूद्र याग, मल्हारी याग या यागांची सेवा होणार असून १५ डिसेंबर रविवार रोजी श्री दत्त पुजन, देवता विसर्जन, अखंड नाम, जप, यज्ञ, जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच १६ डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पुजन व महाआरती ने सप्ताहा ची सांगता होईल या सप्ताह कालावधीत अखंड प्रहराची २४ तास सेवा देखील रूजू होत आहे. तालुक्यातील ६५ गावातील महिला सेवेकरी सकाळी ७:०० ते संध्या चे ७:०० पावेतो तसेच पुरूष सेवेकरी संध्याकाळी ७ ते सकाळचे ७ पावेतो सेवा रुजू करित आहे. या सात दिवसात परीसरात आध्यात्मिक सोहळ्याचे वातावरण निर्माण होते. सप्ताहा दरम्यान विविध विभागाचे याज्ञिकी प्रशिक्षण घेण्यात येते तसेच बालसंस्कार विभागाची  मुलेही यात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवतात. महत्वाचे म्हणजे विवाह ईच्छुक तरुण - तरूणीचे योग्य या ठिकाणी विवाह जुळुन येण्यासाठीचे तोडगे व उपायांची सेवा घेण्यात येणार आहे. श्रींच्या दरबारात फुलहारांची सजावट, रोषणाई देखिल करण्यात आली आहे. सेवेकऱ्यांना पारायणासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षीही पारायण वाचन सेवेत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. साप्ताहीक ग्रामिण भागातील सेवेकरी देखील सेवा रूजू करित आहे. भाविकांनी श्री दत्त जयंती सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
आपल्या मित्र
तालुका माझा न्युज संपादक 
बंडू केशव सोनार 
9158509318

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद