महाराष्ट्र होमगार्ड "78 वा वर्धापन"दिनानिमित्त होमगार्ड युनीट तर्फे श्रीक्षेत्र काकनबर्डी येथे श्रमदान करण्यात आले.

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
6 डिसेंबर होमगार्ड वर्धापन दिवस याचे उचित साधून होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त पाचोरा तालुका युनिट होमगार्ड संघटनेतर्फे हुतात्म्यांना मानवंदना देऊन वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले जसे की शहरात पदसंचालन तसेच पोलीस परेड ग्राउंड वर श्रमदान व पूर्ण तालुक्याचे ग्रामदैवत असलेले खंडोबा महाराज मंदिर काकणबर्डी पाचोरा येथे यात्रेनिमित्त भाविकांकडून घाण कचरा होमगार्ड संघटनेमार्फत श्रमदानाने मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला

यामध्ये पाचोरा तालुका होमगार्ड युनिटचे तालुका समादेशक श्री चंद्रकांत भीमराव महाजन वरिष्ठ फलटण नायक श्री रवींद्र भीमराव पाटील फलटण नायक श्री लक्ष्मण पाटील, श्री जितेंद्र कासार, श्री मनोज पाटील तसेच कंपनी सार्जंट मेजर राजेंद्र पाटील रोहिदास पाटील सार्जंट मनोज गोसावी विभाग नायक कपिल पाटील मनोज पाटील आणि सर्व होमगार्ड कर्मचारी बंधूंनी विशेष परीक्षण घेऊन महाराष्ट्र होमगार्ड वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..