पाचोरा तालुक्यातील बांबरूड़ राणीचे येथे 6 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर राम मनोहर लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
काल दिनांक बांबरूड़ राणीचे येथे 6 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर राम मनोहर लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केला गेला. आधी स्कूल कमिटी चेअरमन श्री. आण्णासाहेब दगाजीराव वाघ यांनी प्रतिमेचे पूजन व प्राचार्य.श्री. डी.व्ही.पाटील सर,पर्यवेक्षक श्री.गणेश पाटील सर माल्यार्पण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी साठी वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये कु.शिवानी सूर्यवंशी हीचा प्रथम क्रमांक आला. तर दुसरा क्रमांक कु. सानिका बाविस्कर हिने घेतला.यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यानंतर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक साळुंखे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. व सिद्धार्थ बाविस्कर सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्याची व संविधान याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील सर यांनी केले यासाठी आभार आर .एस .पाटील सर यांनी मांडले .या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधु-भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी देखील परिश्रम घेतले व कार्यक्रम पार पडला.
Comments
Post a Comment