लोहारा तालुका पाचोरा परिसरातील सरसकट नुकसानीचे पंचनामे सुरू


(ग्रामीण प्रतिनिधी अनिल तडवी सत्य शोध न्युज चॅनल) 
लोहारा परिसरातील परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते त्यामध्ये कापूस सोयाबीन मका ज्वारी इत्यादी पिकांचा तोंडी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला होता त्याबाबत शासन स्तरापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या तक्रारी शासन दरबारी गेल्यामुळे आज प्राथमिक नुकसान अहवाल दिनांक  23/10/2024 रोजी तलाठी मोहन कुलकर्णी लोहारा ,कृषी सहाय्यक आर एच जोहरे, कृषी सहाय्यक रोहिणी पाटील, यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन  मका /कापूस, पिकाचे पंचनामे केले यावेळी शेतकरी देवबा चौधरी, राजू सुर्वे नंदू सुर्वे भास्कर भोई अनिल तडवी विशाल पवार दीपक राजपूत इत्यादी व शेतकरी वर्ग हजर होते पंचनामे सर्वांचे सरसकट केले जातील असे तलाठी व कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांना सांगितले

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..