ठरले! आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत वैशालीताई सुर्यवंशी भरणार उमेदवारी अर्ज !भव्य रॅलीसह सभेचे आयोजन; हजारो समर्थकांची राहणार उपस्थिती

(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा, दिनांक २३ (प्रतिनिधी): शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी या महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक २५ ऑक्टोबर रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करुन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याप्रसंगी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची उपस्थिती राहणार असून यात मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यासह नागरिकांचा सहभाग असणार आहे.

वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी या पाचोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार असतील याचे सूतोवाच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आधीच केले होते. यानंतर मतदारसंघातून त्यांना पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या शिवसेना-उबाठा पक्षाच्या मशाल या चिन्हावर महाविकास आघाडीच्या वतीने जनतेचा कौल मागणार आहेत.

पाचोरा-भडगाव मतदारसंघातून तिकिट जाहीर झाल्यानंतर वैशालीताई सुर्यवंशी यांनी शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी उमेदवारी दाखल करण्याचे जाहीर केले आहे. यानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. याप्रसंगी माजी मंत्री तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. वरखेडी रोडवरील गुरुकुल स्कूल जवळ, सिंधी कॉलनी शेजारील शेतात महा विकास आघाडीच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात आदित्य ठाकरे, शिवसेना-उबाठा पक्षाचे उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख सुनील पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते सभेला संबोधित करतील.

महाविकास आघाडीची सभा आटोपल्यानंतर सभेपासून रॅलीला सुरुवात होईल. रॅली चा मार्ग श्रीराम नगर, सिंदी कॉलनी, वरखेडी नाका, कृष्णापुरी, आठवडे बाजार, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्ग राहील. अशा प्रकारे प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत ही रॅली प्रांत कार्यालयापर्यंत जाऊन तेथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल. या भव्य मिरवणुकीत वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि सर्व मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सोबत मतदारसंघातील जनतेने मोठ्या संख्येने प्रचार रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व चाहत्यांनी वाजत- गाजत या मिरवणुकीच्या माध्यमातून परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन वैशालीताई 2024/10/23  हुकुम आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. 
आगामी विधानसभा निवडणुकीत मी १८ पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून

महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तिकिटावर

उमेदवारी करत आहे. त्या अनुषंगाने शुक्रवार दि. २५ ऑक्टोंबर २०२४ रोजी

सकाळी ११:०० वाजता वरखेडी रोडवरील गुरुकुल स्कुल जवळ, सिंधी कॉलनी

शेजारील मैदानात युवासेनाप्रमुख मा. आदित्यजी ठाकरेसाहेब यांची जाहीर सभा

होईल. त्यानंतर आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वात सभेच्या ठिकाणापासुन रॅलीला

सुरूवात होईल. रॅलीचा मार्ग- गुरूकुल स्कुल (सिंधी कॉलनी), श्रीराम नगर, वरखेडी

नाका, कृष्णापुरी, आठवडे बाजार, गांधी चौक नंतर शिवसेना कार्यालय, छत्रपती

शिवाजी महाराज चौक पर्यंत येईल. तद्नंतर प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल

करण्यात येईल. याप्रसंगी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व

निष्ठावान शिवसैनिक, मतदार बंधु आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार

आहेत. याबाबतची प्रेस नोट मी आपल्याला बातमीच्या स्वरूपात देत आहे. हे वृत्त

आपले वर्तमानपत्र वा पोर्टलवर लावून सहकार्य करावे. सदरचे वृत्त संकलनासाठी

आपण उपस्थित राहून आपले दैनिक वृत्तपत्रात तसेच डिजीटल प्रसार माध्यमात

प्रकाशित करावे ही नम्र विनंती. स्नेह आहेच, तो वृध्दींगत व्हावा ही अपेक्षा.

आपली विश्वासू

वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी

2024/10/23

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद