कजगांव (ता.भडगांव) येथील आशा स्वयंसेविका ठराव पारीत करून गरीब व होतकरू महिलांना डावलण्याचा प्रयत्न..... ग्रामपंचायत यांनी ग्रामसभा घेऊन आदर्श आचारसंहितेचा केला भंग.!!

सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहितेत भडगाव तालुक्यातील कजगांव  ग्रामपंचायत यांनी ग्रामसभा घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग होऊन आशा स्वयंसेविका ठराव पारीत करुन गरीब व होतकरु महिलांना डावलणे विषयी

वरील विषयावर आणि संदर्भित तक्रारी अर्जानूसार मौजे कजगांव ता. भडगांव येथील रहीवाशी सौ. रेखा रामदास मोरे, यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कजगांव ता.भडगाव येथे आशा स्वयंसेविका पदासाठी अर्ज सादर केलेला होता. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कजगांव यांनी दिनांक ०८/१०/२०२४ तसेच दि. १४/१०/२०२४ रोजी ठेवण्यात आलेली ग्रामसभा ही जाणून बुजून पुढे ढकलून ती दिनांक २१/१०/२०२४ रोजी ठेवून अर्जदार यांना डावलून त्यांचे जागी दुसऱ्या उमेदवारास पात्र ठरविण्यात आले असून यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याबाबत तक्रार इकडील कार्यालयांस प्राप्त झालेली आहे. तरी सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपण चौकशी करुन आदर्श आचारसंहिता भंगाबाबत तक्रारीत तथ्य असल्यास आपल्या स्तरावर कार्यवाही करुन तसा

अनुपालन अहवाल या कार्यालयांस सादर

करावा. अशी नोटीस उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांनी संबंधित कर्मचारी यांना दिले आहे

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..