बांबरुड गावाचे भूमिपुत्र माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांची विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत सर्व ग्रामस्थांची नेहमीप्रमाणे नियोजन बैठक


( जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सुनील कोळी सत्य शोध न्युज चॅनल)
बांबरुड गावाचे भूमिपुत्र माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांची विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत सर्व ग्रामस्थांची नेहमीप्रमाणे नियोजन बैठक आदरणीय दिलीप भाऊ वाघ व नानासा संजय ओंकार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 19 10 2024 रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता आयोजित करण्यात आले असता याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर गावातील शेतकरी दगा ओमकार डांबरे यांची बैलजोडी  विहिरीत पडल्यामुळे मयत झाल्याने त्यांना आर्थिक  मदत वाघ परिवारातर्फे देण्यात आली,
यानंतर गावातील माजी पंचायत समिती सदस्य ललित भैय्या वाघ, ज्येष्ठ नागरिक सिंधी गुरुजी, रवींद्र आप्पा पाटील, भिका मिस्तरी, पत्रकार शिवाजी सुतार व इतर यांनी आपले मनोगत व्यक्त केले
अध्यक्ष भाषणात भाऊंनी गावासाठी मी नेहमी सेवेत राहील व राहणार आहे मागील दहा वर्षापासून गावाचा जो विकास खुटला आहे हो मी भरून काढणारच व गावासह परिसराचे गावांचा विकास निधी खेचून आणेन अशी काही दिली, गावाच्या विकासाकरिता कधीही निधीची कमी करता पडू देणार नाही असे सांगितले, यावेळची आमदारकीची लढाई ही आपल्या गावाची राजकीय अस्तित्वाची लढाई असून गावातील मतभेद विसरून सर्वांनी आपल्या पाठीशी उभे राहावे असे भावनिक आव्हान देखील केले यावेळी ग्रामस्थांनी देखील आपल्या पाठीशी उभे राहून भाऊंना विधानसभेत पाठवूच असे वचन दिले,
सदर कार्यक्रमास ग्रामस्थांसह विविध संघटनेचे पदाधिकारी व सदस्य,तरुण मंडळी मोठ्या संख्येवर उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..