मुहूर्त ठरला...आणि प्रतीक्षा संपली... 28 ऑक्टोबर,सोमवार रोजी अमोल शिंदे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून शंखनाद करणार-------------------------------------------------------




(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) 
      येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली असून विधानसभा निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून अत्यंत कमी मताने पराभूत झालेले अमोल शिंदे यांनी मागील विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षापासून न थांबता सतत मतदारसंघातील जनतेच्या सुख-दुःखात उभे राहत आपला जनसंपर्क अजून जोमाने वाढवला आहे.
         मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेले आशीर्वाद,प्रेम आणि दाखविलेला विश्वासावर मी जवळपास 75 हजार मते मिळवू शकलो आणि यावेळी देखील जनतेतून मिळणारा प्रतिसाद बघता आणि त्यांच्या भावना लक्षात घेता मी जनतेचा उमेदवार म्हणून दिनांक 28 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.    सकाळी १०:०० वाजता भारत डेअरी चौफुली येथून रॅलीला सुरुवात होऊन मारुती मंदिर व सप्तशृंगी माता मंदिर कृष्णापुरी - आठवडे बाजारात (परिवर्तन सभा)-  गांधी चौक - जामनेर रोड मार्गे -  छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता होईल तरी मोठ्या संख्येने मला आशीर्वाद व पाठिंबा देण्यासाठी पाचोरा-भडगाव मतदार संघातील जनतेने उपस्थित रहावे असे अमोल शिंदे यांनी आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..