आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील EVM व VvpAt मशीन तहसील कार्यालयामार्फत संपूर्ण तालुक्यात जनजागृती अभियान राबविण्यात आले.!

 (जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सुनील कोळी )    मतदार नोंदणी अधिकारी. 18 पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा  18 पाचोरा विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर दिनांक 22/09/2024 ते 25/09/2024 या कालावधित EVM व VVPAT मशीनचे प्रशिक्षण, प्रसार, प्रसिध्दी व जनजागृती करणेकामी  अधिकारी / कम्रचारी यांची नेमणूक केली आहे. 
       तरी नियुक्त अधिकारी / कर्मचारी हे EVM व VVPAT मशीन सकाळी 08.00 वाजता तहसिल कार्यालय, पाचोरा येथिल स्ट्रॉंग रूम मधून घेऊन ते खेड्यावर जनजागृतीसाठी घेऊन जातात व सायंकाळी सहा वाजता पुन्हा स्ट्रॉंग रूममध्ये जमा करतात. पाचोरा तालुक्यातील 129 गावांमध्ये सदर मशीन जनजागृतीसाठी येणार असून तसे ऑर्डर माननीय उपविभागीय अधिकारी भाग पाचोरा यांनी काढले आहे त्या अनुषंगाने आज दिनांक 24/09/24 रोजी नियुक्त केलेल्या पथकाने जनजागृतीसाठी ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन जनजागृतीसाठी पहान आसनखेडा बुद्रुक, आसनखेडा खुर्द, लासगाव, सामनेर, बांबरुड प्र . बो इत्यादी गावांमध्ये सदर जनजागृती चे काम नियुक्त पथकाने केले असून तसा अहवाल तहसील कार्यालय पाचोरा येथे सादर केला आहे नियुक्त पथकातील कर्मचारी नांद्रा मंडळातील मंडळ अधिकारी भरत नन्नवरे भाऊसाहेब व लासगाव तलाठी दिपक शिवाजी दवंगे सामनेर तलाठी रूपाली रायगडे पहान तलाठी अनिता सुतार बांबरुड तलाठी पल्लवी वाघ इत्यादी पथकातील कर्मचारी यांनी उपस्थिती देऊन प्रचार प्रसिद्धीचे काम केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..