शेत मशागती साठी लागणारी शेतकऱ्याची ट्रॉली चोरणारी टोळी चाळीसगाव शहर पोलीसांकडुन जेरबंद



  (चाळीसगाव प्रतिनिधी सुनील कोळी)
शेत मशागती साठी लागणारी शेतकऱ्याची ट्रॉली चोरणारी टोळी चाळीसगाव शहर पोलीसांकडुन जेरबंद  चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुरनं. ४१७/२०२४ भा. न्या. सं. २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी (शेतकरी) नामे प्रकाश भावसींग पाटील रा. कोदगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव यांचे मालकिची ट्राली तिचेवर अंबीका ट्रॉली नाव असलेली निळ्या रंगाची हि फिर्यादीचे कोदगाव येथील खळ्यात लावलेली असतांना दि.१६/०९/२०२४ रोजी रात्री ०९.०० वा. ते दि.१७/०९/२०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे संमती वाचुन चोरी करुन नेली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सुरु असतांना मा. पोलीस निरिक्षक सो, संदीप पाटील, चाळीसगाव शहर पो.स्टे. यांना मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे नमुद गुन्ह्यातील संशयीतांना अटक करण्यासाठी स्था.गु.शा. जळगाव व चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांचे संयुक्त पथक तयार करुन मिळालेल्या माहिती प्रमाणे सदर गुन्ह्यात १) भुषण रविंद्र पाटील रा. कोदगाव ता. चाळीसगाव, २) कन्हैय्या उर्फ कनु शेषराव देशमुख रा. विजयसिंग राजपुत नगर, पाटणादेवी रोड, चाळीसगाव, ३) गणेश बापु एरंडे रा. खरजई ता.चाळीसगाव अशांना दिनांक २२/०९/२०२४ रोजी अटक करण्यात आली असुन गुन्ह्यातील गेला मुद्देमाल ट्रॉली सह ट्रॉली चोरुन नेण्यासाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर यांचेसह एकुण ४,८०,०००/- रु.किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढिल तपास सुरु असुन फरार आरोपीचां शोध घेणे सुरु आहे.
सदर कारवाई मा. पोलीस निरिक्षक संदीप पाटील, चाळीसगाव शहर पो.स्टे. यांचे मार्गदर्शानाखाली स्था.गु.शा. जळगाव यांचेकडील पोहेकाँ. संदीप पाटील, पोना, महेश पाटील, पोकाँ. १४६ सागर पाटील तसेच चाळीसगाव शहर पो.स्टे. कडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोउपनि. संदीप घुले, स. फौ. विश्वास पाटील, पोहेकाँ. राहुल सोनवणे, पोना, भुषण पाटील, पोकॉ. आशुतोष सोनवणे, पोकाँ, रविंद्र बच्छे, पोकाॅ, विजय पाटील, पोकाँ, पवन पाटील, पोकॉ. अमोल पाटील, पोकाँ. गोपाल पाटील, पोकॉ. शरद पाटील, पोकाँ. मोहन सुर्यवंशी, पोकॉ. नंदु महाजन अशा संयुक्त पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद