बांबरुड राणीचे येथे डॉक्टर राम मनोहर लोहिया माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सखी सावित्री समिती माता पालक संघ मीटिंग आयोजित करण्यात आली
(जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सुनील कोळी)
आज रोजी दिनाक 27/9/2024 वार शुक्रवारी डॉ.राम मनोहर लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये व सखी सावित्री समिती व माता पालक संघ यांच्या अंतर्गत मीटिंग आयोजित करण्यात आली होती. आलेल्या सर्व माता भगिनी यांचे स्वागत विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.गणेश पाटील सर यांनी शब्दसुमनानी स्वागत केले. व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती.एन. ए.पाटील मॅडम यांना देण्यात आले यानंतर विद्यालयाचे प्राचार्य श्री डी. व्ही.पाटील सर यांनी प्रास्ताविक केले व प्रास्ताविका मध्ये विद्यार्थिनीची गुणवत्ता वाढ, तसेच सावित्री समिती अंतर्गत याची माहिती दिली नंतरचे सभेचे काम विद्यालयाच्या महिला शिक्षिका श्री. सोनवणे यू.व्ही.,श्रीमती. वैशाली पाटील मॅडम, श्रीमती जयश्री ठाकरे मॅडम यांनी पार पाडले आलेल्या महिला वर्गातून सूचना मांडण्यात आल्या व योग्य सूचना स्वीकारण्यात आल्या.यावेळी अनेक माता पालक उपस्थित होत्या.आभार श्रीमती.एन. ए.पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व आभार मानले.
Comments
Post a Comment