भडगाव तहसीलदार व पाचोरा प्रांत यांना जात प्रमाणपत्रसाठी कोळी समाजाचे निवेदन देण्यात आले



   (मुख्य संचालक राजेंद्र खैरनार)   
 कजगाव - भडगाव तालुका आदिवासी कोळी समाजाच्या वतीने भडगाव तहसीलदार यांना जात प्रमाणपत्र सुलभ रित्या मिळाले पाहिजे यासाठी भडगाव तालुका आदिवासी कोळी समाज समितीने आज शासकीय विश्राम गृह भडगाव येथे समाजाच्या सामान्य कार्यकर्त्यांची एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी समाजातील जात प्रमाणपत्र काढायला कोणत्या कागदपत्रे आवश्यक असतात तसेच प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणत्या समस्या येतात. इ- सुविधा केंद्रात मोठया प्रमाणात पैसे शासकीय नियम पेक्षा जास्तीचे घेतले जातात, अधिकार नसताना 1950 पूर्वीचे कागदपत्रे मागितली जातात, काही वेळा जात प्रकरणे स्वीकारण्यात आर्थिक मागणी करण्यात येते अश्या असंख्य समस्या समजून घेउन त्याप्रमाणे निवेदन तयार करण्यात आले व ते नवनियुक्त तहसीलदार शीतल सोलाटे यांची भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्यावर त्यांना जात प्रमाणपत्र बाबत समाजातर्फे निवेदन देण्यात आले यावेळी मोठया प्रमाणात  आदिवासी कोळी समाज संघटना चे अनिल सावळे संभाजी शेवरे, नेहरू शेवरे संजय कोळी रामदास कोळी किसन कोळी भगवान कोळी दगडू सोनवणे सुनील मोरे,   प्रा सुरेश कोळी भिवसन निकम, गोकुळ कोळी भडगाव पाचोरा तालुक्यातील सर्व कोळी समाज बांधव उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..