राष्ट्रीय चर्मकार महासंघचा २९ वा वर्धापन दिवस विविध कार्यक्रमानी साजरा


       भडगाव (भडगाव  प्रतिनिधी प्रा सुरेश कोळी )राष्ट्रीय चर्मकार महासंघ चा २९ वर्धापन दिवसानिम्मिताने संत रोहिदास सभागृ हात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेविका योजना पाटील,  तालुका अध्यक्ष रविंद्र आहिरे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष लताबाई आहिरे, युवा अध्यक्ष सुधीर आहिरे याच्या हस्ते करण्यात आले  
      यावेळी तालुका अध्यक्ष रवी आहिरे यांनी मत मांडले की, २४ सप्टेंबर १९९५ रोजी माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघ ची स्थापना करून या देशातील सर्व चर्मकार समाजाला संघटित करत एका महासंघ च्या छत्राखाली आणले महासंघाने जिथे कुठे समाज बांधवावर अन्याय झाला असेल तिथे आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले समाजाला जागृत केले राष्ट्रीय अध्यक्ष घोलप साहेब सोबत राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पदाधिकारी ही महासंघ मार्फत समाज बांधवांसाठी विविध कार्यक्रम राबवत असतात .
   तसेच यावेळी ग्रामीण रुग्णालय व  साई समर्थ मतिमंद शाळेतील मतिमंद विद्यार्थ्यांना फळ वाटप ही उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
     याप्रसंगी पाचोरा पो. स्टे. एएसआय दिलीप अहिरे, उपाध्यक्ष मधुकर वाघ, युवाध्यक्ष सुधीर अहिरे, ता. संघटक संजय शेवाळे, शहर संघटक दगडु गायकवाड, शेतकरी संघ संचालिका मा. नगरसेविका योजना पाटील, निवृत्त आर्मी अधिकारी दिलीप वाघ, साहेबराव पाटील, शिवाजी शिरसाठ, सरदार राठोड, राव साहेब अहिरे, गणेश अहिरे, हेमंत अहिरे, मा. प्राचार्य डी. डी. पाटील सह ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मुंडे, मुक बधीर शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील सह अधिकारी कर्मचारी वृंद, संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र आहिरे तर आभार सुधीर आहिरे यांनी केले यावेळी सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद