बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सलग पाच दिवसांपासुन सकल बंजारा समाज बांधवांचे धरणे आंदोलन व शिवप्रेमी दिलीप पाटलांचे आमरण उपोषण चालू असून. शासन / प्रशासनाने अद्याप पावेतो कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. म्हणून टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असे निवेदन चाळीसगाव तहसीलदार साहेब यांना देण्यात आले
(चाळीसगाव प्रतिनिधी सुनील कोळी ) बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सलग पाच दिवसांपासुन सकल बंजारा समाज बांधवांचे धरणे आंदोलन व शिवप्रेमी दिलीप पाटलांचे आमरण उपोषण चालू असून. शासन / प्रशासनाने अद्याप पावेतो कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. म्हणून टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. चाळीसगांव येथे प्रशासकीय इमारत. नविन तहसील कार्यालय. येथे चालू असलेले शिवप्रेमी मराठा आंदोलक. दिलीप पाटील व बंजारा समाज बहुउद्देशिय संस्था व सकल बंजारा समाज बांधव यांचे चालू असलेले आमरण उपोषण व धरणे आंदोलन. व त्यांच्या मागण्या रास्त असून
१) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला, हरित क्रांतीचे जनक, वसंतरावजी नाईक साहेबांचा नाव देण्यात यावे व २) मुख्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात दर्शनी जागेवर वसंतरावजी नाईक साहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा.
३) घाट रोड नागद चौफुली चौकाचे संत सेवालाल महाराज चौक असे नामकरण करून चौकाचे शुशोभीकरण करण्यात यावे.
४) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तडे पडलेले आहे. त्या संदर्भात तज्ञ समिती नेमून
पुतळ्याची सखोल तपासणी करून, योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.व किती खर्च झाला तो कळवावा. अश्या मागण्यांसाठी सलग पाच दिवसांपासुन समाज बांधवांचे धरणे आंदोलन चालू असून, शासनाने अद्याप पावेतो कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. हे योग्य असुन आमचा ह्या आंदोलनाला पुर्ण पाठिंबा आहे. आणि जर ह्या आंदोलनाची शासनाने
लवकरात लवकर दखल घेतली नाही. तर आम्ही (टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य.) ता. चाळीसगांव जि. जळगांव.
च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
याची आपण गांभीर्याने दखल घेत. ह्या आंदोलनाच्या मागण्या पूर्ण करत.
समाज बांधवांना न्याय द्यावा...
टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष
पै. तानाजी भाऊ जाधव
टायगर ग्रुप खान्देश विभाग अध्यक्ष
पें. हृषीकेश बाबा भांडारकर तसेच यावेळी टायगर ग्रुप चाळीसगाव तालुका.. संपर्क प्रमुख.. रावसाहेब भाऊ कोळी.आबासाहेब गरूड.. कैलास निरभवणे.पंकज राठोड.. भुषण नवगिरे .. प्रफुल्ल भाऊ देशमुख . शैलेश तुपे.बाळू ढगे.. महेंद्र घुंमरे.भुषण आगोणे.नरेद्र राठोड.. सुनील भाऊ परदेशी किरण कोळी सर्व टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते
Comments
Post a Comment