जेष्ठ नागरिकाची सेवा व मार्गदर्शन मिळाल्यास जीवन आनंदी होते -रवींद्र लांडे (मुख्याधिकारी भडगाव न.पा.)


  (भडगाव प्रतिनिधी प्रा . सुरेश कोळी सर)    भडगाव - क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ आजीवन व अध्ययन विभाग आणि अभिनव बहु उदेशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्मृतीभ्रंश दिनानिमित्त जेष्ठ नागरिकाची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन  छत्रपती संभाजी राजे सभागृहात(डोकरा हॉल ) करण्यात 
या कार्यक्रमाचे उदघाटन उमवि अधिसभा सदस्य श्री अमोल पाटील व समाजसेवक अमोल शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नगर परिषदचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, डॉ शशांक कराडे, डॉ सुवर्णा पाटील, डॉ दिलीप बी पाटील होते.यावेळी जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली  प्रारंभी डॉ सुवर्णा पाटील यांनी जेष्ठ नागरिकांना मानसिक आरोग्य कसे चांगले ठेवावे यावर मार्गदर्शन केले. यावेळी ऍड ललिता पाटील यांनी जेष्ठ नागरिकांसाठी चे कायदे व उपाय याबद्दल मार्गदर्शन केले, भडगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी शासनाच्या विविध योजना व त्यांची अंमलबजावणी याविषयी मार्गदर्शन केले पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी पोलीस प्रशासन नेहमी मदत करीत असेल व बँकेसंबधी नियम व सुरक्षितता याबद्दल माहिती दिली डॉ शशांक कराडे यांनी जेष्ठ नागरिकांना येणाऱ्या विविध आरोग्य समस्या व काळजी तसेच आहार कोणते घ्यायला पाहिजे व व्यायाम व  योगासन याविषयी मार्गदर्शन करून  विविध शंका बद्दल माहिती दिली  विविध व्याख्यानामुळे जेष्ठ नागरिकांची मन जिंकल कार्यक्रमास असंख्य जेष्ठ पुरुषम हिलांनी व अभिनव संस्थेचे सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी साठी सहकार्य केले  प्रास्ताविक डॉ सुवर्णा पाटील यांनी तर सूत्रसंचालन चंदा पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ दिलीप बी पाटील यांनी केले. कार्यक्रमा ने जेष्ठ नागरिकांचे मन जिंकले व विधायक प्रतिसाद मिळाला यावेळी आनंदघन जेष्ठ नागरिक सेवा संघ, भडगाव अध्यक्ष रमेश माळी, प्रा सुरेश कोळी, प्रा अविनाश भंगाळे, प्रा एस आर पाटील भगवान शिंदे, दिनकर वाल्हे,प्रभाकर शिंपी, भिकनसिह परदेशीं, विजय देशपांडे, रेखा वाल्हे उपस्थित होते कार्यक्रमास असंख्य जेष्ठ पुरुष व महिलांनी व अभिनव संस्थेचे सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी साठी सहकार्य केले

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..