आज दिनांक २३/९/२०२४ सोमवारी पाचोरा शहरात पाच ठिकाणी अवैध धंद्यावर पोलिस निरीक्षक अशोक पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धाडी टाकुन कारवाई करण्यात आल्या

  (मुख्य संचालक राजेंद्र खैरनार)    पाचोरा शहरात सर्रासपणे चालू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईमध्ये २०,००० रु च्या मुद्देमाला बरोबर व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले  मिळालेल्या खबरनुसार, पाचोरा शहरामध्ये सरराईत पणे  चालु  असलेल्या अवैध उद्योगांवर सोमवारी म्हणजेच  २३/९

/२०२४ रोजी दुपारी दोन वाजेच्या वेळेस पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाड टाकली. याप्रसंगी पाच ठिकाणी धाड टाकण्यात आली.

दरम्यान, सट्टा, चक्री खेळविताना व दारू विक्री करताना २०हजार रूपये व मुद्देमालासोबत  पाच व्यक्तींना ताब्यात घेतले.प्रकाश विठ्ठल पाटील , राहुल निकम, राकेश गोवर्धन मोची, सागर दिलीप कानडे, दिनकर धोंडीराम चव्हाण यांना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली. लगेच नोटीस देऊन या आरोपींना सोडण्यात आले.

पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी साहेब , पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके साहेब, पोलीस कर्मचारी विश्वास देशमुख, राहुल शिंपी,संतोष राजपूत, संदीप राजपूत ,समीर पाटील, समाधान बोरसे यांनी ही कारवाई केली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..