पाचो-यातील राजेश ट्रेडिंग कंपनीचे मालक राजेश जैन यांचा ६१वा वाढदिवस हा झाडे देऊन साजरा पर्यावरण संवर्धनाचा मौलिक संदेश "आता पुढच्या पिढीला अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज नाही – त्यांना हवी आहे ऑक्सिजन!"
(मुख्य संपादक किशोर रायसाकडा)
आता पुढील पिढीला अन्न, वस्त्र, आणि निवाऱ्याची गरज नाही; त्यांनी ते स्वतःच मिळविण्याचे मार्ग शोधले आहेत. मात्र, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे पुढच्या पिढ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गरज उरली आहे – ऑक्सिजन. हा अमूल्य वारसा त्यांच्यासाठी सोडून जाण्यासाठी आपल्याला आता झाडे लावणे आणि त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
राजेश जैन यांचा ६१ वा वाढदिवस झाडे देऊन साजरा – पर्यावरण संवर्धनाचा संदेश
पाचोऱ्यातील राजेश ट्रेडिंग कंपनीचे संचालक श्री. राजेश जैन यांचा ६१ वा वाढदिवस एक अनोख्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. या खास दिवशी श्री. जैन यांनी ६१ झाडांची भेट दिली आणि "झाडे लावा, झाडे जगवा" या सामाजिक संदेशाने पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेतली.
श्री. नरेश जैन यांची संकल्पना या खास संकल्पनेमागे श्री. राजेश जैन यांचे बंधू आणि राजेश ट्रेडिंग कंपनीचे सह-संचालक श्री. नरेश जैन यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी सुचवलेल्या या संकल्पनेला श्री. राजेश जैन यांनी पूर्ण समर्थन दिले आणि या वाढदिवसाचे आयोजन डॉ. आनंद जैन आणि डॉ. नम्रता जैन यांनी केले.
"चला पुन्हा शाळेला जाऊया" – १९७७ बॅचचे अनोखे साजरे या सोहळ्यात गो. से. हायस्कूल पाचोराच्या १९७७ बॅचचे सर्व मित्र सहभागी झाले. या बॅचचा "चला पुन्हा शाळेला जाऊया" गट प्रसिद्ध आहे कारण ते आपल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला अनोख्या पद्धतीने साजरा करतात. गटातील सदस्य प्रत्येकाच्या घरी भेट देऊन जल्लोषात त्यांचे वाढदिवस साजरे करतात.
पर्यावरणपूरक भेट – ६१ झाडांची भेट आणि 'इकिगाई' पुस्तक या कार्यक्रमात ५९ उपस्थित सदस्यांना एका झाडाच्या रोपासह 'इकिगाई' हे पुस्तक भेट देण्यात आले. हा वाढदिवस पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक अनोखी प्रतिज्ञा बनला.
आस्था डेंटल हॉस्पिटलचे संचालक – संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आस्था डेंटल हॉस्पिटल पाचोराचे संचालक डॉ. आनंद जैन आणि डॉ. नम्रता जैन यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. आपल्या वैद्यकीय कार्याबरोबरच सामाजिक जबाबदारी ओळखून त्यांनी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले.
"आता पुढच्या पिढ्यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यापेक्षा ऑक्सिजनची गरज आहे. आपण झाडे लावून त्यांना हा 'वारसा' देऊ शकतो," हा मुख्य संदेश या वाढदिवसाच्या माध्यमातून देण्यात आला.
Comments
Post a Comment